बेळगाव : 'जिव्हाळा फाऊंडेशन'च्यावतीने डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीर

बेळगाव : 'जिव्हाळा फाऊंडेशन'च्यावतीने डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : गुडस् शेड रोड, बेळगाव येथील नर्तकी प्राईड येथे 'जिव्हाळा फाउंडेशन'च्यावतीने डेंग्यू आणि चिकुनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजिण्यात आले होते. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून भाजप ओबीसी मोर्चाचे कर्नाटक राज्य सचिव किरण जाधव यांना निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना किरण जाधव यांनी जिव्हाळा फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. तसेच नागरिकांनी अशा शिबिरांचा लाभ घेऊन आपल्या सोबत आपल्या कुटुंबीयांचे आरोग्य अबाधित राखण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डॉक्टर सविता कद्दू, डॉक्टर सुरेखा पोटे, शेखर पाटील, नितिश जैन, किरण शर्मा, अंकित पोरवाल, राकेश साकारिया यासह जिव्हाळा फाऊंडेशनचे अन्य सदस्य उपस्थित होते. या भागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने घेतला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 'जिव्हाळा फाऊंडेशन'च्यावतीने डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm