बेळगावचे आमदार म्हणाले, मला मंत्री नाय केलं तर राजीनामा देणार! नाराजीनाट्य

बेळगावचे आमदार म्हणाले, मला मंत्री नाय केलं तर राजीनामा देणार! नाराजीनाट्य

belgavkar.com | belgaum | belgavkar

जारकीहोळी बंधूंनाही मंत्रीमंडळात जागा नाही

माजी महिला आणि बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले - निपाणी (बेळगाव) आणि माजी अन्नपुरवठा मंत्री उमेश कत्ती - हुक्केरी (बेळगाव) यांनी घेतली शपथ

कर्नाटकातील मंत्रिमंडळ स्थापनेचा तिढा अखेर सुटला असला तरी आता भाजपमधील इच्छुकांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्तीचे आमदार आनंद चंद्रशेखर मामनी हे येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना विधानसभेचे उपाध्यक्ष होते (Deputy Speaker of the Karnataka Legislative Assembly). मंत्री न बनवल्यास राजीनामा देण्याचा इशारा त्यांनीही दिला आहे. मागील आठवड्यात मामनी यांनी एक व्हिडीओ जाहीर केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, मी एक ज्येष्ठ आमदार आहे. मी मतदारसंघातील जनतेसाठी काम करीत आहे. मला मंत्री बनवले नाही तर उपसभापतिपदाचा राजीनामा द्यावा, असा सल्ला मला समर्थकांनी दिली. त्यांचा सल्ला मी मानेन.
कर्नाटकातील मंत्रिमंडळ स्थापनेचा तिढा निर्माण झाल्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे दिल्लीत (Delhi) ठाण मांडून होते. अखेर पक्षश्रेष्ठींनी मंत्रिमंडळाच्या यादीला हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, आता नाराजीनाट्य सुरू झाले असून, भाजप आमदारांनी राजीनाम्याचा उघड इशारा दिला आहे. आज दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी 29 मंत्र्यांच्या शपथविधी होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली. नव्या मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात येणार असल्याचे संकेत बोम्मई यांनी दिले आहेत. याबाबतची अधिसूचना राजभवनाने काढली आहे. राजभवनातील ग्लास हाऊसमध्ये शपथविधी कार्यक्रम झाला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नवीन मंत्र्यांनी शपथ दिली.
Karnataka cabinet - Caste - Constituency
Shashikala Jolle - Lingayat - Nippani (Belgaum) Umesh Katti - Lingayat - Hukkeri (Belgaum)
Govind Karjol - SC - Mudhol (Bagalkot)
KC Narayana Gowda - Vokkaliga - KR Pete (Mandya)
BC Patil - Lingayat - Hirekerur (Haveri)
Murugesh Nirani - Lingayat - Biligi (Bagalkot)
KS Eshwarappa - Kuruba - Shivamogga (Shivamogga)
Araga Gnanendra - Vokkaliga - Thirthalli (Shivamogga)
BC Nagesh - Brahmin - Tiptur (Tumkuru)
JC Madhuswamy - LIngayat - Chikkanayakanahalli (Tumakuru)
Sunil Kumar - Billava - Karkala (Udupi)
Kota Srinivas Poojary - Billava - MLC
Prabhu Chavan - Lambani - Aurad (Bidar)
CC Patil - Panchamasali - Naragund (Gadag)
R Ashok - Vokkaliga - Padmanabha Nagar (Bengaluru)
Ashwath Narayan - Vokkaliga - Malleshwaram (Bengaluru)
K Gopalaiah - Vokkaliga - Mahalaxmi Layout (Bengaluru )
ST Somashekar - Vokkaliga - Yeshwanthpur (Bengaluru)
Shankar Basangouda Patil - Lingayat - Navalgund (Dharwad)
K.Sudhakar - Vokkaliga - Chikkaballapura (Chikkaballapura)
Halappa Achar - Reddy Lingayat - Yelburga (Koppal)
B Sreeramulu - ST - Molkalmuru (Chitradurga)
Munirathna - Naidu - -RajaRajeshwari Nagar (Bengaluru)
Byrathi Basavaraj - Kuruba - KR Puram (Bengaluru)
Shivaram Hebbar - Brahmin - Yellapura (Uttara Kannada)
MTB Nagaraj - Kuruba - MLC
Anand Singh - Rajput - Hosapete (Vijayanagara - Ballari)
Somanna - Lingayat - Govindarajapuram (Bengaluru)
नवीन मंत्र्यांची अधिकृत जाहीर होण्याआधीच काही आमदारांनी उघडपणे पक्षाला इशारा दिला आहे. आमदार नेहरू ओलेकर यांच्या समर्थकांनी पक्षाला इशारा देत नाराजी व्यक्त केली आहे. बोम्मई हे 1 जुलै रोजी दिल्लीत दाखल झाले होते. ते मंत्रिमंडळाची यादी घेऊन आले होते. त्यांनी कर्नाटकचे प्रभारी अरुणसिंह यांची भेट घेतली होती. बोम्मई यांनी 2 जुलैला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली होती. बोम्मई यांनी म्हटले होते की, मी मंत्रिमंडळाच्या 2 ते 3 याद्या पक्षाच्या अध्यक्षांकडे सादर केल्या आहेत. पक्षाचे अध्यक्ष अंतिम यादी तयार करतील. यानंत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल यांच्याशी चर्चा करुन मंत्रिमंडळ शपथविधीची तारीख निश्चित होईल.
येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात बोम्मई हे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. त्यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा कार्यभार होता. तसेच बोम्मई हे येडियुरप्पा यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळं बोम्मई यांची निवड झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. बोम्मई यांच्या निवडीत येडियुरप्पा यांचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारातही येडियुरप्पा यांचाच वरचष्मा राहील, असे बोलले जाते. बोम्मई हे आधीच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. तसेच त्यांच्याकडं कायदा, संसदीय कार्य ही खातीही होती. 61 वर्षांचे बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे पुत्र आहेत. कर्नाटकातील लिंगायत समाजाचे वर्चस्व विचारात घेऊन भाजपने याच समाजातील बोम्मई यांना पुढे आणले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावचे आमदार म्हणाले, मला मंत्री नाय केलं तर राजीनामा देणार! नाराजीनाट्य
जारकीहोळी बंधूंनाही मंत्रीमंडळात जागा नाही

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm