आता उपमुख्यमंत्रिपद नाहीच; भाजप नेतृत्वाचा मोठा निर्णय

आता उपमुख्यमंत्रिपद नाहीच;
भाजप नेतृत्वाचा मोठा निर्णय

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकातील मंत्रिमंडळ स्थापनेचा तिढा निर्माण झाल्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे दिल्लीत ठाण मांडून होते. अखेर पक्षश्रेष्ठींनी मंत्रिमंडळाच्या यादीला हिरवा कंदील दिला आहे. परंतु, पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्रिपदाला फाटा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. येडियुरप्पांच्या मंत्रिमंडळात तीन उपमुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱ्या नेत्यांची उपमुख्यमंत्री बनवून समजूत काढण्याचा फॉर्म्युला आधी भाजपकडून वापरला जात होता. याचबरोबर जातीय समीकरणे आणि प्रादेशिक समतोल साधण्यासाठी हाच फॉर्म्युला वापरला जाई.
बोम्मई यांच्या मंत्रिमंडळात तर तब्बल 5 उपमुख्यमंत्री असतील, अशी चर्चा सुरू होती. परंतु, पक्षनेतृत्वाने उपमुख्यमंत्रिपदालाच फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, मागील वेळी येडियुरप्पांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात तीन उपमुख्यमंत्री होते. आता एकही उपमुख्यमंत्री न नेमण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला आहे. आज दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी 29 मंत्र्यांच्या शपथविधी होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली आहे. 29 जणांनी आज दुपारी शपथ घेतली आहे.
Karnataka cabinet - Caste - Constituency
Shashikala Jolle - Lingayat - Nippani (Belgaum)
Umesh Katti - Lingayat - Hukkeri (Belgaum)
Govind Karjol - SC - Mudhol (Bagalkot)
KC Narayana Gowda - Vokkaliga - KR Pete (Mandya)
BC Patil - Lingayat - Hirekerur (Haveri)
Murugesh Nirani - Lingayat - Biligi (Bagalkot)
KS Eshwarappa - Kuruba - Shivamogga (Shivamogga)
Araga Gnanendra - Vokkaliga - Thirthalli (Shivamogga)
BC Nagesh - Brahmin - Tiptur (Tumkuru)
JC Madhuswamy - LIngayat - Chikkanayakanahalli (Tumakuru)
Sunil Kumar - Billava - Karkala (Udupi)
Kota Srinivas Poojary - Billava - MLC
Prabhu Chavan - Lambani - Aurad (Bidar)
CC Patil - Panchamasali - Naragund (Gadag)
R Ashok - Vokkaliga - Padmanabha Nagar (Bengaluru)
Ashwath Narayan - Vokkaliga - Malleshwaram (Bengaluru)
K Gopalaiah - Vokkaliga - Mahalaxmi Layout (Bengaluru )
ST Somashekar - Vokkaliga - Yeshwanthpur (Bengaluru)
Shankar Basangouda Patil - Lingayat - Navalgund (Dharwad)
K.Sudhakar - Vokkaliga - Chikkaballapura (Chikkaballapura)
Halappa Achar - Reddy Lingayat - Yelburga (Koppal)
B Sreeramulu - ST - Molkalmuru (Chitradurga)
Munirathna - Naidu - -RajaRajeshwari Nagar (Bengaluru)
Byrathi Basavaraj - Kuruba - KR Puram (Bengaluru)
Shivaram Hebbar - Brahmin - Yellapura (Uttara Kannada)
MTB Nagaraj - Kuruba - MLC
Anand Singh - Rajput - Hosapete (Vijayanagara - Ballari)
Somanna - Lingayat - Govindarajapuram (Bengaluru)
नव्या मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात येणार असल्याचे संकेत बोम्मई यांनी दिले आहेत. याबाबतची अधिसूचना राजभवनाने काढली आहे. राजभवनातील ग्लास हाऊसमध्ये हा कार्यक्रम झाला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नवीन मंत्र्यांनी शपथ दिली. बोम्मई हे 1 जुलै रोजी दिल्लीत दाखल झाले होते. ते मंत्रिमंडळाची यादी घेऊन आले होते. त्यांनी कर्नाटकचे प्रभारी अरुणसिंह यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी संसद भवनात जाऊन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचीही भेट घेतली. बोम्मई यांनी 2 जुलैला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली होती.
येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात बोम्मई हे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. त्यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा कार्यभार होता. तसेच बोम्मई हे येडियुरप्पा यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळं बोम्मई यांची निवड झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. बोम्मई यांच्या निवडीत येडियुरप्पा यांचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारातही येडियुरप्पा यांचाच वरचष्मा राहील, असे बोलले जाते. बोम्मई हे आधीच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. तसेच त्यांच्याकडं कायदा, संसदीय कार्य ही खातीही होती. 61 वर्षांचे बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे पुत्र आहेत. कर्नाटकातील लिंगायत समाजाचे वर्चस्व विचारात घेऊन भाजपने याच समाजातील बोम्मई यांना पुढे आणले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

आता उपमुख्यमंत्रिपद नाहीच; भाजप नेतृत्वाचा मोठा निर्णय

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm