Tokyo Olympic : जबरदस्त, शानदार!; भारताच्या रवी कुमार दहिया सुवर्णपदकासाठी लढणार

Tokyo Olympic : जबरदस्त, शानदार!;
भारताच्या रवी कुमार दहिया सुवर्णपदकासाठी लढणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

भारताचे आणखी एक मेडल नक्की, रवी कुमारची फायनलमध्ये धडक

Tokyo Olympic 2020 : कुस्तीमध्ये पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाचा उपांत्य फेरीचा सामना भारताचा रवी कुमार दहिया आणि कझाकिस्तानचा नुरीस्लॅम सानायेव्ह यांच्यात खेळवण्यात आला. रवी कुमारनं जोरदार कमबॅक करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. रवी कुमारनं पहिल्या दोन मिनिटांत उत्तम बचावात्मक खेळ केला. पण, कझाकच्या खेळाडूनं पहिला गुण घेतला. त्यानंतर रवीनं मजबूत पकड करत दोन गुण घेत आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांच्या खेळात रवी कुमारनं 2-1 अशी आघाडी घेतली होती.
दुसऱ्या सत्रातील पहिल्याच मिनिटात नुरीस्लॅमनं अँकर लेग (मगर पकड) करत 8 गुण कमावले अन् 9-2 अशी भक्कम आघाडी घेतली. पुढच्या मिनिटाला रवी कुमारनं कझाकिस्तानच्या खेळाडूला रिंग बाहेर फेकून 3 गुण घेत पिछाडी 5-9 अशी कमी केली. कझाकिस्तानचा खेळाडू जखमी झालेला पाहायला मिळाला, परंतु प्राथमिक उपचार घेत तो पुन्हा मॅटवर परतला. रवीनं जबरदस्त आक्रमक खेळ करताना प्रतिस्पर्धी खेळाडूची पाठ मॅटवर टेकवून 4 गुण घेतले. अन Victory by fall नियमानुसार रवीला विजयी घोषित करण्यात आले. रवी कुमार दहियाने 14-4 असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.
2012 नंतर ऑलिम्पिकमधील भारताचे हे कुस्ती प्रकारातील पहिलेच पदक आहे. तत्पूर्वी त्याने उपउपांत्यपूर्व लढतीत कोलंबियाच्या ओस्करचा 13-3 असा धुव्वा उडवला होता. पुरुषांच्या 86 किलो फ्रीस्टाईल कुस्तीच्या गटात दीपक पुनिया आणि चीनचा शेन यांच्यातील ही लढत रोमहर्षक झाली. या लढतीत दीपक पुनियाने सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र खेळाच्या मध्यावर चिनी कुस्तीपटूने जोरदार मुसंडी मारत 3-3 अशी बरोबरी साधली. मात्र सामना संपण्यासाठी काही सेकंदांचा वेळ असताना दीपकने निर्णायक डाव खेळत 2 गुण कमावले आणि विजय निश्चित केला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Tokyo Olympic : जबरदस्त, शानदार!; भारताच्या रवी कुमार दहिया सुवर्णपदकासाठी लढणार
भारताचे आणखी एक मेडल नक्की, रवी कुमारची फायनलमध्ये धडक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm