belgaum-yellur-newly-married-woman-committed-suicide-belgaum-crime-belgaum-muchandi-married-girl-jyoti-202108.jpg | बेळगाव : महिनाभरात स्वतःला संपवलं; येळ्ळूरला नवविवाहितेची आत्महत्या | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : महिनाभरात स्वतःला संपवलं; येळ्ळूरला नवविवाहितेची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : येळ्ळूर येथे नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री सातच्या सुमारास उघडकीस आली. ज्योती सुनील चतुर (वय 21, रा. येळ्ळूर) असे मृताचे नाव आहे. तिचा दीड महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. याबाबत वडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुचंडी येथील ज्योतीचा दीड महिन्यापूर्वी येळ्ळूर येथील सुनील चतुर यांच्याशी विवाह झाला होता.
मंगळवारी घरात कोणी नसताना तिने बेडरूमध्ये आतील कडी लावून घेतली. या ठिकाणी तिने हुकाला गळफास घेतला. येळ्ळूरला नवविवाहितेची गळफासाने आत्महत्या घरचे आल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याची माहिती वडगाव पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत मृत विवाहितेच्या पालकांनी काहीही तक्रार नसल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून तिची मानसिक स्थिती बिघडली होती. यातूनच तिने गळफास घेतल्याचे पोलिसांना सांगितले. मृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल केला आहे.