बेळगाव : किल्ला तलावात बुडून मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : रिक्षा चालकाचा किल्ला तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. कुतबुद्दिन शेख (वय 42, रा. अमीन गल्ली, गांधीनगर) असे मृताचे नाव आहे. शेख हे रिक्षाचालक म्हणून कार्यरत होते. त्यांना दारूचे व्यसन असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांची मासिक स्थिती बिघडली होती.
मंगळवारी पहाटे ते घरातून बाहेर पडले. सकाळी ते घरी दिसून न आल्याने त्यांचा मुलगा व कुटुंबियांनी परिसरात शोध घेतला. परंतु, ते कुठेच आढळून आले नाहीत. येथील किल्ला तलावात एकजण बुडाल्याची माहिती कोणीतरी मार्केट पोलिसांना दिली. पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. त्याची ओळख पटवली असता गांधीनगरचे बेपत्ता शेख असल्याचे स्पष्ट झाले. मृताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून याची मार्केट पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी पुढील तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : किल्ला तलावात बुडून मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm