बेळगाव : खून प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी

बेळगाव : खून प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : केवळ ₹ 2000 रुपयांसाठी येळ्ळूर रोड, वडगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस ऑटो रिक्षा स्टॅण्डसमोर सोमवारी सकाळी 9.15 वाजता गवंडी कामगार मित्राचा खून करण्यात आला होता. मयत महादेव मारुती जाधव (वय 50, मूळचा रा. आंबेवाडी, सध्या रा. हमालवाडा भारतनगर, सहावा क्रॉस, शहापूर) यांचा संशयित आरोपी सूरज पुंडलिक केदारीचे (वय 35, रा. नाझर कॅम्प, वडगाव) याने कटरने हल्ला करून खून केला होता.
belgaum-vadagav-murder-yellur-vadagav-ves-belgaum-murder-mahadev-202108.jpg | बेळगाव : खून प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी | belgaum news | belgavkar बेळगावकर
खून झाल्यानंतर काही तासातच आरोपीला शहापूर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात केली आहे. खूनानंतर वडगाव परिसरात खळबळ उडाली होती. आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्यानंतर शहापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली. संशयित आरोपीवर गुन्हा नोंदवून शहापूर पोलिसांनी तिसरे जेएमएफसी न्यायालयासमोर हजर केले. संशयित सूरज याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली.
उसने दिलेल्या ₹ 2000 रुपयांची मागणी केल्याच्या कारणावरून मित्राने चाकूने गळ्यावर सपासप वार करून खून केल्याचे सोमवारी उघडकीस आले आहे. महादेव जाधव व सुरज पुंडलिक केदारी हे दोघेही एकाच कारखान्यात काम करत होते. महादेवने सुरजकडून उसने ₹ 2000 रुपये घेतले होते. यापूर्वी सूरजने पैशाची मागणी केली असता महादेवने त्याला मारबडव केली होती. मी दिलेल्या माझ्याच पैशाची मागणी केल्याने मलाच मारबड करतोस म्हणून या रागाने संतापलेल्या सूरजने सोमवारी सकाळी त्याच्यावर पाळत ठेवून चाकूने गळ्यावर सपासपा वार करून त्याचा खून केला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : खून प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm