belgaum-smuglling-kasv-belgaum-forest-dept-two-arrested-turtle-202108.jpg | बेळगाव : कासवाची तस्करी; दोघांना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : कासवाची तस्करी; दोघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कासवांची तस्करी करून त्यांची विक्री करत असताना वनविभाग पोलिसांनी धाड टाकून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 2 कासव आणि मोटारसायकल जप्त केली आहे. बीएसयेडियुराप्पा रोडवरील मारुती मंदिरजवळ वनविभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली. पुंडलिक लक्ष्मण नसलापुरे (वय 27, रा. विजयनगर, चिकोडी) आणि शशांक नागेश पुजारी (वय 23, रा. वडगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
दोघेजण जंगलातून बेकायदेशीररीत्या दोन कासव आणून त्यांची विक्री करत असल्याची माहिती वनविभागाच्या पोलीस अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकार्‍यांनी सापळा रचून या दोघांना अटक केली. तसेच दोन जिवंत कासव आणि मोटारसायकल जप्त केली आहे. 3 किलो 850 ग्रॅम आणि 1 किलो वजन असलेले कासव जप्त करण्यात आले आहे. वनविभागाच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली.