बेळगाव महापालिकेवर मराठी फलक लावा; तसेच कायद्यानुसार मराठी भाषिकांना सुविधा पुरवा

बेळगाव महापालिकेवर मराठी फलक लावा;
तसेच कायद्यानुसार मराठी भाषिकांना सुविधा पुरवा

belgavkar.com | belgaum | belgavkar

केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयुक्त

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने (बेळगाव) बेळगाव महानगरपालिकेवर मराठी फलक लावण्यासाठी मनपा आयुक्तांना तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती. पण त्यांचा काहीच प्रतिसाद न भेटल्याने युवा समितीने थेट केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री श्री. मुख्तार अब्बास नखवी तसेच चेन्नई येथील भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांना पत्र पाठवले होते. या अर्जाची दखल घेत चेन्नई येथील दक्षिण व पूर्व विभाग भाषिक अल्पसंख्याक कार्यालय, चेन्नईचे सहाय्यक आयुक्त श्री एस शिवकुमार यांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहले आहे.
बेळगावात मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे, तसेच 2013 मध्ये धारवाड उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची माहिती घेत, नव्या महानगरपालिका इमारतीवर मराठी फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. या सोबतच घटनेतील कलम 29 नुसार जिथं 15% पेक्षा जास्त प्रमाणात राहणाऱ्या भाषिकांना त्याना सर्व कागदपत्रे, विविध प्रकारच्या सरकारी सूचना मराठीमध्ये देण्याचे निर्देश मनपा आयुक्तांना दिले आहेत. तरी याची अंमलबजावणी करून भाषिक अल्पसंख्याक कार्यालय आणि युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांना याची माहिती देण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव महापालिकेवर मराठी फलक लावा; तसेच कायद्यानुसार मराठी भाषिकांना सुविधा पुरवा
केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयुक्त

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm