नवीन मुख्यमंत्री एकटेच... आठवडा उलटूनही जोडीला कुणी मंत्री नाहीत!

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शपथ घेऊन आठवडा होत आला असून, ते सध्या मंत्रिमंडळातील एकमेव सदस्य आहेत. त्यांच्या जोडीला सध्या एकही मंत्री नसल्याचे चित्र आहे. बोम्मई हे मागील तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. कर्नाटकातील मंत्रिमंडळ स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांनी 26 जुलैला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक घेऊन त्यावेळी गृहमंत्री असलेले बसवराज बोम्मई हे मुख्यमंत्रिपदासाठी निवडले गेले होते.
नंतर बोम्मई यांनी 28 जुलैला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत एकाही मंत्र्याने शपथ घेतली नव्हती. तेव्हापासून मंत्रिमंडळ स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. बोम्मई यांच्यासोबत दोन ते तीन उपमुख्यमंत्री दिले जातील, अशीही चर्चा आहे. याचबरोबर येडियुरप्पांनी आणलेला दबावही या विलंबास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी बोम्मई हे 1 जुलै रोजी दिल्लीत दाखल झाले आहेत. ते मंत्रिमंडळाची यादी घेऊन आले आहेत. त्यांनी आजा कर्नाटकचे प्रभारी अरुणसिंह यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी संसद भवनात जाऊन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचीही भेट घेतली. बोम्मई यांनी काल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली होती.
बोम्मई यांनी म्हटले आहे की, मी मंत्रिमंडळाच्या 2 ते 3 याद्या पक्षाच्या अध्यक्षांकडे सादर केल्या आहेत. पक्षाचे अध्यक्ष अंतिम यादी तयार करतील. यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल यांच्याशी चर्चा करुन मंत्रिमंडळ शपथविधीची तारीख निश्चित होईल. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात बोम्मई हे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. त्यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा कार्यभार होता. तसेच बोम्मई हे येडियुरप्पा यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळं बोम्मई यांची निवड झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. बोम्मई यांच्या निवडीत येडियुरप्पा यांचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारातही येडियुरप्पा यांचाच वरचष्मा राहील, असे बोलले जात होते.
येडियुरप्पा यांनी बोम्मई यांना चांगले काम करण्याचा सल्लाही दिला. बोम्मई यांनी शपथ घेतल्यानंतर गरीबांना मदत करण्यावर भर असेल, असे सांगितले आहे. दरम्यान, बोम्मई हे त्यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. तसेच त्यांच्याकडं कायदा, संसदीय कार्य ही खातीही होती. 61 वर्षांचे बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे पुत्र आहेत. कर्नाटकातील लिंगायत समाजाचे वर्चस्व विचारात घेऊन भाजपने याच समाजातील बोम्मई यांना पुढे आणले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

नवीन मुख्यमंत्री एकटेच... आठवडा उलटूनही जोडीला कुणी मंत्री नाहीत!

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm