बेळगाव : 11 दिवसांनी पूल खुला; अद्यापही पाणी पात्राबाहेर

बेळगाव : 11 दिवसांनी पूल खुला;
अद्यापही पाणी पात्राबाहेर

belgavkar.com | belgaum | belgavkar

दूधगंगा नदीवरील एकसंबा - दानवाड पुलावरील ओसरलेले पाणी

बेळगाव ता. चिकोडी - एकसंबा : पाणलोट क्षेत्रात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठी महापुराचा विळखा बसला होता. दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ उतार होत असल्याने अद्यापही पाणी पात्राबाहेर आहे. आज मंगळवारी सकाळी दूधगंगा नदीवरील एकसंबा - दानवाड दरम्यानच्या पुलावरील पाणी तब्बल 11 दिवसांनी ओसरले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत वाहतुकीस बंद करण्यात आलेला हा पूल चार महिन्यानी सध्या महापूर ओसरल्यानंतरच वाहतुकीस खुला झाला आहे.
कृष्णा व दूधगंगा नद्या अद्यापही दुथडी भरून वाहत आहेत. महापूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त नागरिक आपापल्या घरी जात आहेत. पण पिकांचे खूप सारे नुकसान झाल्याने तसेच अनेक पिके कुजल्याने नदीकाठी दुर्गंधी पसरली आहे. तसेच कचऱ्याचेही साम्राज्य पसरले आहे. जनावरांना ओला चाऱ्याची कमतरता भासत आहे. विद्युत खांब पुराच्या पाण्यात बुडाल्याने विद्युत तारांवर कचरा अडकला आहे. तर अनेक विद्युत खांबे वाकली आहेत. सदरच्या दुरुस्तीच्या कामामुळे विद्युत पुरवठा खंडित असल्याने पाण्याचा पुरवठा करण्यात व्यत्यय निर्माण होत आहे.
कृष्णा नदीची पाणीपातळी 534.71 मीटर असून दूधगंगा नदीची पाणीपातळी 535.3 मीटर इतकी आहे. दूधगंगा नदीतून 24122 क्युसेक, राजापूर बंधाऱ्यातून 154250 क्युसेक तर कल्लोळ कृष्णा नदीच्या पात्रात 178362 क्युसेक पाण्याचा विसर्ग येत आहे. अद्यापही पाणी पात्राबाहेरच आहे. पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार कायम असल्याने पाण्याचा उतार कासव गतीने होत आहे. पाणलोट क्षेत्रातील गेल्या 24 तासातील पावसाचे प्रमाण पाहता कोयना 25 मिमी, नवजा 22 मिमी, महाबळेश्वर 66 मिमी, काळम्मावाडी 24 मिमी, वारणा 22 मिमी, राधानगरी 60 मिमी, पाटगाव येथे 41 मिमी पाऊस झाला आहे. तर चिकोडी तालुक्यातील पर्जन्यमापन केंद्रावरील अंकली 2.8 मिमी, सदलगा 0.8 मिमी तर चिकोडी, नागरमुन्नोळी व जोडट्टी येथे 0 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 11 दिवसांनी पूल खुला; अद्यापही पाणी पात्राबाहेर
दूधगंगा नदीवरील एकसंबा - दानवाड पुलावरील ओसरलेले पाणी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm