बेळगाव : कणबर्गी योजनेचा आराखडा आणि नकाशा देण्यास टाळाटाळ

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : न्यायालयाने भू-संपादन करण्यास स्थगिती दिलेली जमीन वगळून कणबर्गी योजनेचा आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सदर योजनेचा नकाशा देण्यात यावा, अशी मागणी बुडाकडे सातत्याने करण्यात येत आहे. पण नकाशा देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. कणबर्गी येथील शेतकर्‍यांनी बुडा आयुक्तांची भेट घेऊन नकाशा देण्याची मागणी केली.
कणबर्गी येथील पिकाऊ शेतजमिनीत वसाहत योजना राबविण्यास काही शेतकर्‍यांनी आक्षेप घेतला आहे. न्यायालयात धाव घेऊन भू-संपादन करण्यास स्थगिती घेतली आहे. उर्वरित 110 एकर शेतजमीन मालकांनी योजना राबविण्यास संमती दर्शविली आहे. त्यामुळे बुडाने ही योजना राबविण्यासाठी आराखडा तयार केला आहे. सदर आराखडा राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या आराखड्याला शासनाने मंजुरी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. काही शेतकर्‍यांच्या शेतजमीन संपादित करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
या शेतकर्‍यांच्या जमिनी वगळून आराखडा तयार करण्यात आल्याचे बुडाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा आराखडा देण्यात यावा, अशी मागणी बुडाकडे करण्यात आली होती. पण आराखडा देण्यास बुडाचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी बुडा आयुक्त जी. टी. दिनेशकुमार यांची भेट घेऊन आराखडा देण्याची मागणी केली. सदर आराखडा अभियांत्रिकी विभागात असून देण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. पण त्यानंतर आराखडा उपलब्ध नसल्याचे शेतकर्‍यांना सांगण्यात आले. त्यामुळे शेतकर्‍यांनी बुडा अध्यक्ष घुळाप्पा होसमनी यांची भेट घेऊन आराखडा देण्याची विनंती केली. यावेळी सिद्धेश्वर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कणबर्गी योजनेचा आराखडा आणि नकाशा देण्यास टाळाटाळ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm