बेळगाव : महात्मा फुले रोडवर लॉज व्यवस्थापकावर हल्ला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : लाॅजमध्ये राहण्यास खोली दिली नाही म्हणून लॉज व्यवस्थापकावर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी मध्यरात्री महात्मा फुले रोडवर घडली आहे. जतीन श्रीकांत होसुरकर (वय 28, रा. कोरे गल्ली, शहापूर) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. विनायक उर्फ गिड्डू याने हा हल्ला केल्याचा आरोप होत हे. गिड्डूवर शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे.
जखमी जतीन हा महात्मा फुले रोडवरील ब्ल्यु रे हॉटेलचा व्यवस्थापक आहे. रविवारी (1 ऑगस्ट) रात्री गिड्डू आपल्या एका मित्रासमवेत लॉजमध्ये गेला. काऊंटरवर असलेल्या ओंकार रमेश चौगुले याला गाठून खोली देण्याची मागणी केली. त्यावेळी तेथेच असलेले व्यवस्थापक जतीन यांनी लॉज फुल्ल आहे, खोली नाही, असे सांगितले. खोली नसल्याचे सांगितल्यामुळे रागाने बाहेर पडलेला गिड्डू 15 मिनिटांनी मध्यरात्री 12 वाजता पुन्हा हॉटेलजवळ आला.
हॉटेलजवळ थांबलेल्या जतीनला शिवीगाळ करीत मला का खोली दिला नाहीस, अशी विचारणा केली व त्याच्यावर चाकूने हल्ला केला. शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार पुढील तपास करीत आहेत. गिड्डूवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : महात्मा फुले रोडवर लॉज व्यवस्थापकावर हल्ला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm