बेळगाव : सेक्शुअल चॅट, नंतर ब्लॅकमेलिंक करत पैशांची मागणी; आक्षेपार्ह व्हिडीओद्वारे ब्लॅकमेलिंग;

बेळगाव : सेक्शुअल चॅट, नंतर ब्लॅकमेलिंक करत पैशांची मागणी;
आक्षेपार्ह व्हिडीओद्वारे ब्लॅकमेलिंग;

belgavkar.com | belgaum | belgavkar

आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग

बेळगाव : ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये सध्या प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे फ्रॉड करणाऱ्या भामट्यांना जेरबंद करणं पोलिसांपुढेही मोठं आव्हान असतं. तुमचं मुलीसोबत सेक्शुअल अँक्टिव्हिटी करतानाचे क्षण आम्ही कॅमेऱ्यात कैद केले आहेत. आता संबंधित व्हिडीओ आम्ही WhatsApp, Facebook आणि YouTubeवर टाकू. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल होईल. जगभरातील लाखो लोक तो व्हिडीओ बघतिल. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होऊ नये, असं वाटत असेल तर पैसे द्या, अशा प्रकारची मागणी या भामट्यांकडून केली जाते.
व्हिडीओ कॉलिंगद्वारे मिळविलेले त्याचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणारी टोळी बेळगावात सक्रिय झाली असून नागरिकांनी या टोळी पासून सावध रहावे असे आवाहन बेळगाव सायबर पोलिसांनी केले आहे. सोशल मिडीयावर तुमचा फोटो बघून तो फोटो लाईक करुन फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवणे. ती एक्सेप्ट केल्यानंतर मेसेंजरच्या माध्यमातून चॅटिंग सुरू करणे, व्हिडिओ कॉलवर अश्लील संभाषण सुरू करणे, अश्लील पोझ देणे आणि तशी पोझ दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीस घेण्यास सांगून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतो असे धमकावून ब्लॅकमेल करणारी टोळी बेळगावात सक्रिय झाली आहे.
या टोळीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे आणि सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी केले आहे. व्हिडीओ कॉलिंग गॅंगपासून नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे. व्हिडीओ कॉलिंगद्वारे बेळगावात अनेक जण फसले गेले आहेत. आता हा नवीन प्रकार बेळगावात सुरू झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे पोलिसांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : सेक्शुअल चॅट, नंतर ब्लॅकमेलिंक करत पैशांची मागणी; आक्षेपार्ह व्हिडीओद्वारे ब्लॅकमेलिंग;
आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm