पॉर्न रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली अभिनेत्रीला केली अटक, जबरदस्ती शूट करायची अश्लील व्हिडिओ

पॉर्न रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली अभिनेत्रीला केली अटक, जबरदस्ती शूट करायची अश्लील व्हिडिओ

belgavkar.com | belgaum | belgavkar

अलीकडेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा याला पॉर्न आणि अश्लील व्हिडिओ बनवल्या प्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणानंतर पॉर्न फिल्म बनवणाऱ्या अनेक लोकांची आणि अभिनेत्रींची नावे समोर येत आहेत. आता कोलकाता पोलिसांनी नॅन्सी भाभी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री 30 वर्षीय नंदिता दत्ता हिला अश्लील व्हिडिओ बनवल्या प्रकरणी अटक केली आहे. नंदिता दत्तासह तिचा सहकारी मैनाक घोष (वय 39) यालाही अटक करण्यात आली आहे.
या दोघांवर नवीन मुलींना वेब सीरिजमध्ये कामाचे आमिष दाखवून आणि धमकी देऊन पॉर्न व्हिडिओ बळजबरीने शूट करून घेण्याचे आदेश आहेत. नंदिताने स्वतः देखील अश्लील सिनेमांमध्ये काम केले आहे, ज्यात तिच्या पात्राचे नाव नॅन्सी भाभी होते. 26 जुलै रोजी दोन मॉडेलनी नंदिता आणि मैनाक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर दोघांनाही पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली.
तक्रार करणाऱ्या मॉडेलने आरोप केला आहे की तिचा न्यूड व्हिडिओ जबरदस्तीने बल्लीगंजच्या एका स्टुडिओमध्ये शूट करण्यात आला. शहरातील न्यू टाऊन हॉटेलमध्ये तिच्या मैत्रिणीकडून एका अडल्ट व्हिडिओमध्ये जबरदस्तीने काम करून घेतल्याचा आरोपही पीडितेने यावेळी केला.
ई-टाइम्सशी बोलताना, एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले, 'आम्ही नंदिता आणि मैनाक यांना त्यांच्या इतर सहकाऱ्यांबद्दल विचारू आणि हे लोक कुठल्या ठिकाणी पोर्नचं शूट करायचे याचाही तपास करू. तसेच हे व्हिडिओ कुठे विकले गेले आणि ही टोळी कोणत्या मोठ्या पॉर्न रॅकेटचा भाग आहेत का हे देखील तपासले जाईल.' अभिनेत्री नंदिता दत्ता आणि फोटोग्राफर मैनाक घोष यांच्या अटकेनंतर पोलिसांनी अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी आणखी एका फोटोग्राफरला अटक केली आहे. शुभंकर दे असं या आरोपी फोटोग्राफरचं नाव आहे. तो मूळचा हुगळी जिल्ह्यातील आहे. तो नंदिता दत्तासोबत नवीन मॉडेल्सचे फोटो क्लिक करायचा अशा त्याच्यावर आरोप आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

पॉर्न रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली अभिनेत्रीला केली अटक, जबरदस्ती शूट करायची अश्लील व्हिडिओ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm