news.jpg | बेळगाव : वडगावात प्राणघातक हल्ल्यात एक ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : वडगावात प्राणघातक हल्ल्यात एक ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

₹ 2000 रुपयासाठी मित्राचा केला खून

बेळगाव : आज (2 ऑगस्ट) सोमवारी सकाळी वडगाव - येळ्ळूर वेस बसस्थानक रिक्षा स्टँड जवळ अज्ञात मारेकर्‍यांनी एकावर प्राणघातक हल्ला केला आहे. सकाळी 9.30 वाजता वडगाव - येळ्ळूर रोडवर झालेल्या या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झालायं. महादेव मारुती जाधव (वय 56, रा. हमालवाडा, भारतनगर, वडगाव, मूळचा, आंबेवाडी गाव, बेळगाव) असे त्यांचे नाव आहे. सध्या भारतनगर येथे ते राहत होते.
belgaum-vadagav-murder-yellur-vadagav-ves-belgaum-murder-mahadev-202108.jpg | बेळगाव : वडगावात प्राणघातक हल्ल्यात एक ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर
मयत महादेव जाधव
प्राणघातक हल्ला केल्यानंतर मारेकरी पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांची पुढील कारवाई चालू असून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. खूनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. खून कोणी व का केला, याबाबत पोलिस कसून चौकशी करत होते.

Latest Update @ 4PM : उसने दिलेल्या ₹ 2000 रुपयांची मागणी केल्याच्या कारणावरून मित्राने चाकूने गळ्यावर सपासप वार करून खून केल्याचे सोमवारी उघडकीस आले आहे.
महादेव जाधव व सुरज पुंडलिक केदारीचे (वय 35, रा. नाझर कॅम्प, वडगाव) हे दोघेही एकाच कारखान्यात काम करत होते. महादेवने सुरजकडून उसने ₹ 2000 रुपये घेतले होते. यापूर्वी सूरजने पैशाची मागणी केली असता महादेवने त्याला मारबडव केली होती. मी दिलेल्या माझ्याच पैशाची मागणी केल्याने मलाच मारबड करतोस म्हणून या रागाने संतापलेल्या सूरजने सोमवारी सकाळी त्याच्यावर पाळत ठेवून चाकूने गळ्यावर सपासपा वार करून त्याचा खून केला.