बेळगाव : त्या दोघी निघाल्या थेट अमेरिकेला

बेळगाव : त्या दोघी निघाल्या थेट अमेरिकेला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : त्या दोघी अनाथ.. शिवाय शारीरिक व मानसिकदृष्ट्याही कमकुवत. येथील गंगम्मा चिकुंबी मठाने त्यांना आधार दिला होता; पण आता त्या दोघी थेट अमेरिकेत निघाल्या आहेत. त्यांना अमेरिकेतील दाम्पत्यांनी दत्तक घेतले आहे. बेळगाव येथील स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान या दत्तक केंद्रातील दोन मुलींचा दत्तकविधान कार्यक्रम गुरुवारी पार पडला. बॅडी मुल्डर आणि त्यांची पत्नी डिना तसेच अँन्ड्यू रॉबिन्सन व त्यांची पत्नी नॅना मूल दत्तक घेण्यासाठी अमेरिकेहून बेळगावात आले होते. या दाम्पत्यांनी प्रत्येकी एक मुलगी दत्तक घेतली. बेळगावचे पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, डॉ. मनीषा भांडणकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
दत्तक घेण्यात आलेल्या दोन्ही मुलींची शारीरिक व मानसिकदृष्ट्या विशेष काळजी घेण्याचीही गरज आहे. या मुलींना दत्तक घेण्यासाठी या दोन्ही दाम्पत्यांनी तब्बल दीड वर्ष प्रतीक्षा केली. कोरोना व लॉकडाउनमुळे या प्रक्रियेत अडथळे आले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी दोन्ही मुलींचा ताबा त्यांच्याकडे देण्यात आला. भारतातून मूल दत्तक घेण्याची आपली इच्छा होती, ती इच्छा पूर्ण झाली आहे. आता भारत देशासोबत आपले भावनिक बंध निर्माण झाले आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
या संपूर्ण प्रक्रियेत डॉ. मनीषा भांडणकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली. मुले झाल्यानंतर त्यांचे पालकत्व नको असेल, तर मग त्यांना कुठेही सोडले जाते. ती मुले तर शारीरिक व मानसिकदृष्ट्या कमकुवत असतील तर मग त्यांचे भविष्यच अंधकारमय होते; अशाच अनाथ मुलींना दत्तक घेण्याचा मानस अमेरिकेतील या दाम्पत्यानीकेला होता. दत्तक घेण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पातळीवरील कारा (Central Adoption Resource Authority CARA) या संस्थेची मदत घ्यावी लागली. अमेरिकेतील या दाम्पत्याचे अनुकरण अन्य पालकांनी करावे, विशेष देखभालीची गरज असलेल्या मुलांना मायेची उब द्यावी, असे आवाहन यावेळी डॉ. मनीषा भांडणकर यांनी केले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : त्या दोघी निघाल्या थेट अमेरिकेला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm