बेळगावातून मंत्रिपदाची लॉटरी कोणाला...?

जिल्ह्यात चर्चेला उधाण;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटीलही मंत्रिपदाच्या शर्यतीत

मंत्रिमंडळाचा आज बुधवारी विस्तार : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची माहिती

कर्नाटक राज्याचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यास पक्षश्रेष्ठींनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. येत्या तीन-चार दिवसांत असा विस्तार नियोजित असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातून केएमएफ अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी (अरभावी, बेळगाव), माजी मंत्री उमेश कत्ती (हुक्केरी, बेळगाव) व्यतिरिक्त आणखी कोणाला मंत्रिपदाची संधी मिळते, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटीलही या शर्यतीत आहेत. त्यापैकी कोणाची वर्णी लागेल, यावर प्रत्येक आमदाराच्या समर्थकांची चर्चा सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यात भाजपाचे 12 आमदार आहेत. माजी मंत्री रमेश जारकीहोळी (गोकाक) हे सीडी प्रकरणात अडकल्यामुळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू भालचंद्र जारकीहोळींना मंत्रिपद देण्यात येणार आहे. पण स्थानिक भाजपाच्या सूत्रांनी मात्र अद्याप कोणाचेही नाव अंतिम झाले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कुडचीचे (रायबाग, बेळगाव) आमदार पी. राजीव, रायबागचे (बेळगाव) आमदार दुर्योधन एहोळे यांच्याव्यतिरिक्त कागवाडचे (बेळगाव) आमदार श्रीमंत पाटील यांचीही नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजी महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले (निपाणी) यांच्यावर आरोप होत असल्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी आहे. महिला कोट्यातून शशिकला जोल्ले यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्यांची यादी तयार झाली असून केवळ घोषणा बाकी आहे. यामुळे आता पुढील आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, कर्नाटकाचे पक्ष प्रभारी अरुण सिंग, कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांच्यासह काहीजणांशी मंत्रिमंडळाबाबत चर्चा केली. ही चर्चा यशस्वी झाल्याची माहिती मिळाली आहे.
बहुप्रतिक्षित कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार आज बुधवारी निश्‍चित झाला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती राजभवनाला दिली आहे. याकरिता सकाळी 11 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता अशा दोन वेळा मागितल्या आहेत. मंत्रिपद मिळणार्‍यांना थेट संपर्क साधून बंगळूरचे निमंत्रण देण्यात आले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावातून मंत्रिपदाची लॉटरी कोणाला...? जिल्ह्यात चर्चेला उधाण;
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटीलही मंत्रिपदाच्या शर्यतीत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm