बेळगाव : निपाणी येथील बस स्थानक आवारात बुधवारी (28 जुलै) सकाळी झालेल्या अपघातातील जखमी ट्रक चालकाचा मृत्यू झाला. सिकंदर महंमद इनामदार (वय 51, रा. कोरेगाव - सातारा) असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे. घटनेची नोंद निपाणी शहर पोलिस स्थानकात शुक्रवारी झाली आहे.
28 जुलैला सिकंदर ट्रक घेऊन जाताना येथील बस स्थानक आवारातील अज्ञात वाहनाला धडक दिली. घटनेत सिकंदरला दुखापत झाली होती. मात्र तो ट्रक सोडून पळून गेला. त्याने या दिवशी महात्मा गांधी रुग्णालयात अपघाताबाबत माहिती न देता इंजेक्शन घेऊन गेला होता. सिकंदर दोन दिवस मद्यपान करीत फिरत राहिला. आज सकाळी सिकंदरचा मृतदेह महात्मा गांधी रुग्णालय परिसरात आढळला होता.