बेळगाव ता. चिकोडी : कब्बूर गावातील गणेश नगरातील नावगेर मळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. महांतेश श्रीकांत नावी (वय 25) वश्रीशैल बसवराज नावलगेर (10) अशी मृतांची नावे आहेत. महांतेश आणि श्रीशैल दुपारी दोनच्या दरम्यान विहिरीत पोहायला शिकण्यासाठी कंबरेला डबा बांधून उतरले होते.
पण बांधलेला डबा सुटल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिकोडी अग्निशामक दलाचे टी. बी. परीट व इतर कर्मचाऱ्यांनी सहा तासांच्या शोधकार्यानंतर दोन्ही मृतदेह रात्री आठच्या दरम्यान स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढले. याप्रकरणी चिकोडी पोलिसात नोंद झाली आहे.