कोल्हापुरात मुसळधार, महापुराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेत NDRFची पथकं रवाना

कोल्हापुरात मुसळधार, महापुराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेत NDRFची पथकं रवाना

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोल्हापूर जिल्ह्याला दोन दिवसांपासून पावसाने झोडपून काढलंय.

कोल्हापूर : कोल्हापुरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊ सुरू आहे. मुसळधार पावसामुळे धरण, नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होऊ लागली असून आज नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. आताही पावसाची परिस्थिती जैसे थेच आहे. जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे एनडीआरएफची दोन पथकं कोल्हापुरकडे रवाना झाली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याला दोन दिवसांपासून पावसाने झोडपून काढलंय. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यात संततधार सुरू असून, राधानगरी, काळम्मावाडी, चांदोली या धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आलं असून या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच मांडुकली येथं कुंभी नदीचं दोन फूट पाणी रस्त्यावर आलंय. यातच, पंचगंगा नदी लवकरच धोक्याची पातळी ओलांडेल. 39 फूट ही पंचगंगा नदीची इशारा पातळी असून सध्या नदीची पातळी 35 फूट आहे.
जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. नीलजी आणि ऐनापूर हे दोन बंधाऱ्यावर पाणी आल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. तसेच, गडहिंग्लज-चंदगड राजमार्गावर दुपारपर्यंत पाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये, त्यामुळे कोल्हापूर- रत्नागिरी महामार्ग बंद करण्यात आलाय. मलकापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर येल्लुर गावाजवळ 2 फूट पाणी आल्यानं प्रशासनानं महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
एनडीआरएफची पथकं रवाना : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात चार दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. महापुराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सावधगिरीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आलं आहे. आज सकाळी आठ वाजता पुणे येथून दोन पथके कोल्हापूरसाठी रवाना झाली असल्याचे एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य महापूर परिस्थिती लक्षात घेऊन 1 जून ते 15 ऑगस्टपर्यंत या पथकांना कोल्हापुरात तैनात करण्याचं नियोजन होतं. पण, शासनाने आज पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कोल्हापुरात मुसळधार, महापुराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेत NDRFची पथकं रवाना
कोल्हापूर जिल्ह्याला दोन दिवसांपासून पावसाने झोडपून काढलंय.

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm