gadag-soldier-from-karnataka-martyred-in-naxal-attack-at-chhattisgarh-202107.jpeg | कर्नाटक : हल्ल्यात जवान शहीद | belgaum news | belgavkar बेळगावकर

कर्नाटक : हल्ल्यात जवान शहीद

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक - गदग : छत्तीसगड येथे नक्षलींच्या हल्ल्यात गदग येथील जवान शहीद झाला. लक्ष्मण गौरण्णवर (वय 31, रा. गोजनूर, ता. लक्ष्मेश्वर, जि. गदग ) असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. छत्तीसगड येथील सीमावर्ती भागात नक्षली नक्षली आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत लक्ष्मण यांना गोळी लागून वीरमरण आले.
लक्ष्मण हे गेल्या 12 वर्षांपासून बीएसएफमध्ये सेवा बजावत लक्ष्मण गौरण्णवर होते. दोन महिन्यांपूर्वीच ते आपल्या गावी सुट्टीवर येऊन गेले होते. त्यांचे पार्थिव मूळ गावी आणण्याबाबत शासकीय पातळीवर तयारी केली जात आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.