पवित्र श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय...?

पवित्र श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय...?

belgavkar.com | belgaum | belgavkar

श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना. यावर्षी ही पवित्र श्रावण महिना 9 ऑगस्ट 2021 पासून सुरु होईल आणि 6 सप्टेंबर 2021 रोजी संपेल. महादेवाला अत्यंत प्रिय असलेल्या या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातच कावड यात्रा निघते. श्रावण महिन्यातील सोमवारचेही विशेष महत्त्व आहे.
यावर्षी श्रावण महिन्यात 5 सोमवार असतील :
पहिला श्रावण सोमवार – 9 ऑगस्ट 2021
दुसरा श्रावण सोमवार – 16 ऑगस्ट 2021
तिसरा श्रावण सोमवार – 23 ऑगस्ट 2021
चौथा श्रावण सोमवार – 30 ऑगस्ट 2021
पाचवा श्रावण सोमवार – 06 सप्टेंबर 2021
श्रावण महिन्यातला सोमवार हा दिवस मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो. श्रावण सोमवारी उपवास ठेवून महादेवाची मनोभावे पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि महादेव आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात.
श्रावण महिन्याचे महत्त्व : श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. यामुळेच या काळात महादेवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. मान्यता आहे की श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.
महादेव-गौरीची पूजा : श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात. मूठभर तांदूळ आणी तीळ, मूग, जवस, सातूची शिवमूठ एकेक सोमवारी शिवाला वाहतात. तर नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर, नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात. त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देतात.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

पवित्र श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय...?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm