गुणकारी कडुलिंबाची पाने; जाणून घ्या विविध फायदे
neem

गुणकारी कडुलिंबाची पाने;
जाणून घ्या विविध फायदे

belgavkar.com | belgaum | belgavkar

विविध औषधी वनस्पतींमध्ये प्रामुख्याने कडुलिंबाचे नाव घेतले जाते. कडुलिंबाची पाने अनेक अर्थाने गुणकारी आहेत. त्वचेपासून ते किडनी स्टोनपासून अनेक व्याधींपासून सुटका मिळवण्यासाठी एक प्रभावी औषध म्हणून कडुलिंबाची पाने उपयुक्त ठरू शकतात. या पानांमध्ये अँटीबॅक्टीरियल आणि अँटीफंगल गुणधर्म भरलेले आहेत. याचा उपयोग त्वचेसंबंधी विविध व्याधी दूर करण्यास होतो. त्याचबरोबर इतर विविध स्वरुपांच्या व्याधींवरही कडुलिंबांची पाने गुणकारी आहेत.
1. कडुलिंबांच्या पानांचा स्वाद थोडासा कडवट असतो. त्यामुळे अनेक लोक या पानांचे सेवन करायला कचरतात. मात्र यामुळे ते लोक आपल्या आजारपणातून सहजासहजी सुटका करण्याची संधी गमावतात. आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात घेतल्यास आपण रोज सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चघळल्यास आपल्या शरिरात रोग प्रतिकार क्षमता वाढते. अर्थात आपण कोणत्याही आजारांचा सामना करण्यास सक्षम बनतो. कडुलिंबाच्या पानांमुळे आपले रक्त साफ होते, त्यामुळे अनेक प्रकारचे शारिरीक विकारांपासून आपली सुटका होते.


2. शरीरावर कुठेही जखम झाल्यास ती वेळीच बरी होत नाही. अशावेळी कडुलिंबाच्या पानांचा अवश्य वापर करा. कडुलिंबाच्या पानांचा जखमेवर लेप लावल्यास आपणास लवकर आराम मिळू शकतो. जखम वेळीच भरते तसेच वेदनांपासूनही आराम मिळतो.
3. जर तुमच्या शरीराला वारंवार खाज येत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाची पाने उपयुक्त ठरतील. ज्या ठिकाणी खाज उठते, त्या ठिकाणी दररोज कडुलिंबांच्या पानांचे तेल लावा आणि शक्य झाल्यास पाने खाण्याचाही प्रयत्न करा. जर तुम्हाला थेट पाने खाता येत नसतील तर त्या पानांचे वाटप करून त्यापासून छोट्या छोट्या गोळ्या बनवा. नंतर तुम्ही त्या गोळ्या सुकवून पाण्यासोबत सकाळी आणि रात्री दोन दोन गोळ्या खाऊ शकता.


4. कडुलिंबाची पाने पाण्यामध्ये उकळून ते पाणी प्यायल्यास पोटातील किडे मरतात. या पाण्यापासून ताप, फ्लू तसेच इतर संसर्गजन्य रोग दूर होतात. गर्भवती महिलांनी कडुलिंबाच्या पानांचे पानी अवश्य प्यावे. कारण याचा प्रसृतीदरम्यान फायदा होऊ शकतो. गर्भवती महिलांना प्रसृतीदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून बराच अंशी आराम मिळू शकतो, त्यांना कमी वेदना होऊ शकतात. मात्र गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्यावरूनच हा उपाय करा.
5. कडुलिंबाची पाने मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांना अधिक गुणकारी आहेत. अशा लोकांच्या शरीरातील ग्लुकोज लेव्हल नियंत्रित करण्यास कडुलिंबाच्या पानांची मोठी मदत होऊ शकते. जर तुम्ही कडुलिंबाची पाने खाऊ शकत नसाल तर पानांचा ताजा रस करून प्या.
6. कडुलिंबाची पाने केसांसाठी एक नॅचरल कंडिशनरच्या रुपात काम करतात. पानांचे वाटप करून ते केसांवर लावा. त्यामुळे केस गळण्याच्या समस्येतून सुटका होऊ शकते. हळूहळू केस गळण्याची समस्या कायमची दूर होऊ शकते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

गुणकारी कडुलिंबाची पाने; जाणून घ्या विविध फायदे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm