बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी
belgaum-tribute-chhatrapati-sambhaji-maharaj-jayanti-belgaum-sp-shivpratishthan-hindusthan-202106

बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

belgavkar.com | belgaum | belgavkar

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 364 वी जयंती : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगाव

बेळगाव : मंगळवार जेष्ठ शुद्ध द्वादशी शके 1943 (22 जून) रोजी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती निमित्त धर्मवीर श्री संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करून महाराजांच्या मूर्तीला उदित रेगे आणि अमोल केसरकर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालण्यात आला. बेळगाव शहर कार्यवाह श्री विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते हार घालून पूजन करण्यात आले. ध्येय मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
पूजेचे पौरोहित्य श्री नितिन कुलकर्णी यांनी केले. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांनी आपलं अखंड आयुष्य हिंदवी स्वराज्य व्रत घेऊनच जगले. आणि संभाजी महाराजांची जयंती ही आपल्या हिंदुतिथीनुसार झाली पाहिजे. संभाजी महाराज पाची पातशाह्या, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज या परकीय सत्तेविरुद्ध लढले. आणि आज त्या परकीय तारखेनुसार आपलेच काही लोक त्यांची जयंती करण्याचा अट्टहास करतायेत ही दुर्देवी गोष्ट आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षी जयंती, पुण्यतिथी, शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसाराच साजरा केला जातो.
तसेच संपूर्ण हिंदुसमाजानेही तिथीनुसारच सगळे कार्यक्रम करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री किरण गावडे यांनी केले. यावेळी अनंत चौगुले, किरण बडवण्णाचे, अंकुश केसरकर, अतुल केसरकर, गजानन निलजकर, प्रमोद चौगुले, अभिजित अष्टेकर, गजानन पाटील, वैभव धामणेकर, नामदेव पिसे, विजय कुंटे, महेश पावले, ओंकार पुजारी, प्रतीक काकतकर, श्रीपाद कित्तूर, मिहीर बोंद्रे, रोहन आपटेकर, स्वप्निल वाघवडेकर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 364 वी जयंती : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगाव

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm