शौक बडी चीज है! अब्जाधीश जेफ बेजोस जीव धोक्यात घालून अंतराळात जाणार; म्हणे, बालपणीचे स्वप्न

शौक बडी चीज है! अब्जाधीश जेफ बेजोस जीव धोक्यात घालून अंतराळात जाणार;
म्हणे, बालपणीचे स्वप्न

belgavkar.com | belgaum | belgavkar

जगातील सर्वात मोठे अब्जाधीश आणि अ‍ॅमेझॉन (amazon) कंपनीचे सीईओ जेफ बेजोस हे बालपणीचे स्वप्न साकार करण्यासाठी अंतराळाच्या प्रवासावर जाणार आहे. बेजोस त्यांचीच कंपनी 'ब्लू ओरिजिन'च्या रॉकेटमधून 20 जुलैला अंतराळाच्या प्रवासासाठी रवाना होणार आहेत. या प्रवासात बेजोस केवळ 11 मिनिटे अंतराळात राहणार आहे. 
बेजोस काय करू शकत नाहीत? त्यांच्याकडे 190 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. ते सुरफास्ट प्रायव्हेट जेटने जगभराची भ्रमंती करू शकतात, यॉटद्वारे समुद्रात फेरफटका मारू शकतात, मित्रांसोबत वेळ घालविण्यासाठी एक मोठेच्या मोठे बेटही खरेदी करू शकतात.
मात्र, बेजोस यांना अंतराळाच्या प्रवासाला जायचे आहे. ही 11 मिनिटे एवढी धोकादायक आहेत, की त्यांचा जीवही जाऊ शकतो. बेजोस यांची कंपनी ब्‍लू ओरिजिन गेल्या दशकभरापासून न्‍यू शेफर्ड रॉकेटवर मेहनत घेत आहे. भारताची अंतराळवीर कल्पना चावला यांचा परतत असताना अपघात झाला होता. यामुळे ब्लू ओरिजिन याची काळजी घेत आहे. या रॉकेटच्या खूप चाचण्या घेण्यात आल्या आहेत. बेजोस आणि त्यांचे भाऊ मार्क बेजोस या रॉकेटने अंतराळ भ्रमंतीला जाणार आहेत. सीएनएनने याबाबतचे वृत्त दिले आहे. बेजोस आपला जीव धोक्यात घालून अंतराळात जाणार आहे.  बेजोस यांचे हे रॉकेट पृथ्वीपासून 100 किमी उंचीवरच जाणार आहे. ही अंतराळाची सुरुवात म्हटली जाते. 
बेजोस यांचे रॉकेट एका ठराविक अंतरावर बेजोस असलेल्या कॅप्सूलपासून वेगळे होणार आहे. हे कॅप्सूल स्वयंचलित आहे. त्याला पायलटची आवश्यकता नाही. गेल्या 15 टेस्टमध्ये या कॅप्सुलला कोणताही अपघात झालेला नाही. अंतराळात राहून पुन्हा पृथ्वीवर परतताना कक्षेत प्रवेश केल्यावर त्याचे तापमान 3500 डिग्री फॉरेनहाइट पर्यंत जाईल. यावेळी बेजोस यांच्यावर दबाव वाढणार आहे. तसेच वेगही प्रचंड असणार आहे. स्पेससूट घालण्याची आवश्यकता नाही तरीदेखील ऑक्सिजन कमतरता जाणवू लागली तर त्याची सोय करण्यात आलेली आहे. बेजोस 20 जुलैला अंतराळात रवाना होणार आहेत. हा तोच दिवस आहे जेव्हा अमेरिकेच्या अपोलो यानाने चंद्रावर पाऊल ठेवले होते. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

शौक बडी चीज है! अब्जाधीश जेफ बेजोस जीव धोक्यात घालून अंतराळात जाणार; म्हणे, बालपणीचे स्वप्न

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm