काळ्या बुरशीचा फटका बसलेल्या रुग्णांना सरकारकडून मोफत उपचार : आरोग्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र राज्य

काळ्या बुरशीचा फटका बसलेल्या रुग्णांना सरकारकडून मोफत उपचार : आरोग्यमंत्री

belgavkar.com | belgaum | belgavkar

म्युकर मायकोसिस काय आहे, काळजी कशी घ्यावी, उपचार काय आहेत?

कोव्हिड बरा झालेल्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाल्यानंतर अशा रुग्णांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून मोफत उपचार दिले जातील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी काही जणांना आपला डोळा देखील गमवावा लागला आहे. एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला 'म्युकर मायकॉसिस' म्हणतात. काळी बुरशी म्हणूनही ही ओळखली जाते.
कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका हा सहव्याधी म्हणजेच मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असलेल्या लोकांना अधिक आहे. कोव्हिड-19 ची लागण झालेल्यांपैकी 70 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण सहव्याधीने ग्रस्त आहेत. त्यापैकी अनेकजणांचा कोव्हिड बरा होत आहे पण तरीदेखील त्यांना या व्याधींचा त्रास होत आहे. कोव्हिडमधून बरं झाल्यावर काय काळजी घ्यायची..? कोव्हिड बरा झाल्यावर काही रुग्णांना आणखी एका आजाराचा धोका आहे, तो म्हणजे म्युकर मायकॉसिस. हा आजार काय आहे, आणि कोणाला या आजाराचा जास्त धोका आहे. काळ्या बुरशीचा फटका बसलेल्या रुग्णांना मोफत उपचार कसे मिळतील, याबाबत राज्य सरकारने काय म्हटले आहे.
काय आहे 'म्युकर मायकॉसिस'? राज्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येऊन धडकली. तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये डोळे आणि नाकामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारीत वाढ झालीये. मुंबईच्या सर जे.जे रुग्णालयाचे नाक-कान घसातज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण सांगतात, सोप्या शब्दात सांगायचं झालं. तर, म्युकर मायकॉसिस हा बुरशीमुळे होणारा आजार आहे. तज्ज्ञ सांगतात, बुरशीच्या (Fungus) संसर्गाचा धोका अनेकांना असतो. सायनसमध्ये (Sinus) नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत ही बुरशी साठून राहाते. ही बुरशी हवेतून पसरते. ज्या व्यक्तीला याचा संसर्ग झाला आहे, अशा व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता असते, असं डॉ. चव्हाण पुढे सांगतात.
'म्युकर मायकॉसिस' आजाराची लक्षणं? तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, देशभरात या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी रुग्णांनी आजाराची लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे. नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयाचे नाक-कान घसातज्ज्ञ डॉ. शरद भालेकर या आजाराची 4 प्रमुख लक्षणं सांगतात.
· नाकातून रक्त येणं
· मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी
· डबल व्हिजन म्हणजे, एखादी गोष्ट दोन दिसून येते
'म्युकर मायकॉसिस' ची कारणं? डॉ. चव्हाण म्हणतात, रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्यांना याचा त्रास होत नाही. पण, ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांच्यासाठी ही बुरशी घातक आहे. मुंबईच्या व्हॉकार्ट रुग्णालयाच्या फिजीशिअन डॉ. हनी सावला 'म्युकर मायकॉसिस'ची 4 प्रमुख कारणं सांगतात.
. अनियंत्रित मधुमेह. शरीरातील सारखेचं अनियंत्रित प्रमाण
· स्टीरॉईडचा अतिरिक्त किंवा गरजेपेक्षा जास्त वापर
· ब्रॉड स्पेक्ट्रम एन्टीबायोटिक्स
· शरीरातील न्यूट्रोफिल्स कमी होणं
रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना हा आजार होत असल्याने, सर जे. जे. रुग्णालयाच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. रागिनी पारेख म्युकर मायकॉसिसला संधीसाधू आजार म्हणतात.
कोरोनासंसर्ग आणि म्युकर मायकॉसिसचं नातं काय? तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्यूकर मायकॉसिसचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं दिसून आलंय. डॉ. भालेकर याची कारणं सांगतात,
· कोरोनारुग्णांची उपचारादरम्यान कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती
· कोव्हिड रुग्णांना दिले जाणारे स्टीरॉईड्ज
· शरीरातील व्हायरसची संख्या कमी करण्यासाठी कोरोनाग्रस्तांना जाणारी औषध : कोरोनारुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर, संसर्गाला सायनसमध्ये शिरण्यासाठी वाव मिळतो. ज्यामुळे संसर्ग पसरतो, असं ते म्हणतात.
मधुमेही रुग्णांना जास्त त्रास का होतो? कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत, मधुमेहाने ग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहींच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी असणं, हे संसर्गाचं प्रमुख कारण. जे जे रुग्णालयात म्युकर मायकॉसिसमुळे उपचार घेणारे बहुतांशी रुग्ण मधुमेहाने ग्रस्त आहेत, असं डॉ. पारेख सांगतात.
डोळे जाण्याची शक्यता : तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सायनसमध्ये वाढलेलं इन्फेक्शन डोळ्यांच्या ऑर्बिटमध्ये (डोळा असलेलं ठिकाण) जातं. डॉ. रागिनी पारेख सांगतात, संसर्ग डोळ्यात गेल्यास उपचार आव्हानात्मक आहेत. काही केसमध्ये रुग्णाचा डोळा काढावा लागतो. डॉक्टर सांगतात, त्यांच्याकडे येणारा रुग्ण सायनसमध्ये कंजेशन किंवा डोळ्यांनी कमी दिसत असल्याची तक्रार घेऊन येतो.
हा संसर्ग जीवघेणा आहे का?
तज्ज्ञ सांगतात, म्युकर मायकॉसिसवर योग्यवेळी उपचार झाले नाहीत. तर, संसर्ग शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकतो. व्हॉकार्ट रुग्णालयाच्या डॉ. हनी सावला सांगतात, म्युकर मायकॉसिसने ग्रस्त एका रुग्णाचा मृत्यू झालाय. संसर्ग शरारातील मेंदू आणि फुफ्फुसापर्यंत पोहोचला. तर, रुग्णाला मेंदूत संसर्ग होण्याची शक्यता असते. ज्यामुळे पॅरालिसिस किंवा मृत्यू होण्याची भीती असते, असं डॉ. अमोल पाटील सांगतात.
उपचार काय? डॉ. चव्हाण म्हणतात, म्युकर मायकॉसिसग्रस्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागते. सायनस क्लिअर करण्यासाठी 'एन्डोस्पोपिक सायनस सर्जरी' करुन बुरशी काढली जाते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

काळ्या बुरशीचा फटका बसलेल्या रुग्णांना सरकारकडून मोफत उपचार : आरोग्यमंत्री
म्युकर मायकोसिस काय आहे, काळजी कशी घ्यावी, उपचार काय आहेत?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm