कर्नाटक : अखेर वाहनांना परवानगी | भाजीपाला आणि किराणा माल आणण्यासाठी परवानगी | Lockdown | कडक निर्बंध

कर्नाटक : अखेर वाहनांना परवानगी | भाजीपाला आणि किराणा माल आणण्यासाठी परवानगी | Lockdown | कडक निर्बंध

belgavkar.com | belgaum | belgavkar

शहरी आणि खेड्यातील / ग्रामीण भागातील लोकांनाही परवानगी

सकाळी 6 ते 10 या वेळेतही अत्यावश्यक सेवा वाहतूकीला परवानगी

कर्नाटक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लाॅकडाऊनमध्ये मोकाट फिरणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई होत आहे. कर्नाटक राज्यात कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. सकाळी 6 ते 10 या वेळेत बाजारपेठेत भाजीपाला आणि किराणा सामान आणण्यासाठी दुचाकी किंव्हा चारचाकी वाहतूकीवर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान खेड्यातील / ग्रामीण भागातील जनतेला 3-4 किलो मीटर भाजीपाली आणि किराणा सामान आणण्यासाठी चालत जावे लागत असल्याने राज्य सरकारवर टिका झाली आणि त्या निर्णयाचा विरोध झाल्याने आता कर्नाटकाचे डीजी आयजीपी प्रवीण सूद यांनी तुमच्या जवळच्या शहरातील किंव्हा गावापील बाजारपेठेत भाजीपाला आणि किराणा सामान आणण्यासाठी दुचाकी किंव्हा चारचाकी वाहनाला परवानगी दिली आहे. पण याचा गैरफायदा घेतल्यास कारवाई आणि वाहन जप्ती अटळ आहे.
DGP KARNATAKA @DgpKarnataka
To buy groceries, vegetables and daily needs there is NO BAR for using vehicle to yr neighbour hood shop in cities or nearest availability point in rural areas. Use this facility with discretion & not as a licence for free run everyday. Stay at home for your own safety.
तसेच सकाळी 10 वाजल्यानंतर बेशिस्त नागरिकांविरुद्ध कडक व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. केवळ तेवढ्यावरच न थांबता, गरज पडल्यास संबंधित व्यक्तींची वाहनेही जप्त केली जात आहेत. सकाळी 6 ते 10 या वेळेत कोणत्याही सबळ कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार आहे.
Lockdown दरम्यान, विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात येणार आहेत. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. लॉकडाऊनवेळी (10 वाजल्यानंतर) वाहनांना रस्त्यावर फिरकू देऊ नका, असा आदेश शासनाने दिलेला आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरु राहील. लॉकडाऊन काळात सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडून आवश्यक साहित्याची खरेदी करावी. मात्र सकाळी 10 वाजल्यानंतर आपत्कालीन परिस्थिती वगळता नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही.
सकाळी 10 नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत आपत्कालीन सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत सकाळी 10 वाजल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. 24 मे पर्यंत प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 10 मे ला सकाळी 6 वाजल्यापासून या निर्बंधांची सुरुवात झाली असून, 24 मे सकाळी 6 वाजेपर्यंत हे नियम लागू असतील. कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे हे निर्देश दिले आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटक : अखेर वाहनांना परवानगी | भाजीपाला आणि किराणा माल आणण्यासाठी परवानगी | Lockdown | कडक निर्बंध
शहरी आणि खेड्यातील / ग्रामीण भागातील लोकांनाही परवानगी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm