कर्नाटकात अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच प्रवेश, इतर वाहनांना पाठवले परत

कर्नाटकात अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच प्रवेश, इतर वाहनांना पाठवले परत

belgavkar.com | belgaum | belgavkar

महाराष्ट्रातून कर्नाटकात 'नो एंट्री';
कोगनोळीत कडक बंदोबस्त

कर्नाटक : कर्नाटक राज्य शासनाने यापूर्वीच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसणाऱ्यांना राज्यातील प्रवेशास बंदी घातली आहे. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 10 मे ते 24 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करून नव्याने नियमावली जारी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांनाच राज्यातील प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी या ठिकाणाहून कर्नाटकात प्रवेश करू इच्छिणारी अनेक वाहने परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहेत.
कोगनोळी येथील नाक्यावरून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या चार चाकी प्रवासी वाहनांबरोबरच मोटरसायकल व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनाही थांबवून परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे. कर्नाटकात अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी कर्नाटकातील अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र तसेच महाराष्ट्रात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींना कर्नाटकातील रहिवासाचा बाबतचे ओळखपत्र असल्याशिवाय राज्यात प्रवेशास मज्जाव करण्यात येत आहे.
यामुळे पोलिसांना चकवा देऊन आंतरराज्य प्रवास करणार्‍या नागरिकांना चाप बसत आहे. अनावश्यक फिरणाऱ्या व्यक्तींवर ही वाहने जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. या नाक्यावर सुमारे 25 पोलिस व होमगार्डसचा ताफा तैनात करण्यात आला आहे. कर्नाटकात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 10 ते 24 मे अखेर राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. सुरू झालेल्या या कारवाईमुळे महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली. केवळ अत्यावश्यक वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून याचा फटका कर्नाटक सीमाभागाला बसत आहे. त्यामुळे राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार निपाणी पोलिसांतर्फे कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी तपासणी नाका येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. Lockdown च्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावरून महाराष्ट्र व अन्य राज्यांतून येणाऱ्या चारचाकी वाहनधारकांना परत पाठवून देण्यात येत आहे.
कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांची मोठी पंचाईत झाली. कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी प्रवाशांनी येथे उपस्थित अधिकाऱ्यांना विनवण्या सुरू केल्या होत्या. सीमा तपासणी नाक्यावरून अत्यावश्यकमधून वैद्यकीय सेवेला सुभा दिली आहे. त्यांची सर्व माहित नोंद करूनच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. सीमा तपासणी नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त तीन शिफ्टमध्ये सुरू आहे. कोरोना तपासणी संबंधित असलेली सर्व ती कागदपत्रे पडताळून मगच कर्नाटकात प्रवेश देण्याच्या सूचना आलेल्या आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटकात अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच प्रवेश, इतर वाहनांना पाठवले परत
महाराष्ट्रातून कर्नाटकात 'नो एंट्री'; कोगनोळीत कडक बंदोबस्त

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm