बेळगाव : काय सांगता ! होय, चक्क डॉक्टरांचे कपडे घालून रस्त्यावर उतरला तरुण आणि... अजब! VIDEO

बेळगाव : काय सांगता ! होय, चक्क डॉक्टरांचे कपडे घालून रस्त्यावर उतरला तरुण आणि... अजब! VIDEO

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे घरात बसलेल्या लोकांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळं आता चक्क लोकं रस्त्यावर उतरून अजब प्रकारच लाॅजिक वापरत फिरत आहेत. असाच प्रकार बेळगावमध्ये घडला. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र आता लोकं विनाकारण फिरण्यासाठी संचारबंदीत अनेक प्रकारच्या युक्ती लढवत आहेत. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये एक तरूण चक्क डॉक्टरांचे कपडे (ॲप्राॅन) घालून रस्त्यावर दुचाकीवरुन एकाठिकाणी जाण्याचा प्रयत्न कर होता. एवढेच नाही तर त्याने आयडीही गळ्यात टांगली होती. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच शेअर केला आहे. पोलिसांनाच फसविण्याचा प्रयत्नात बेळगाव जिल्हा रुग्णालयासमोर हा प्रकार घडला आहे.
YouTube Video पाहा
Watch YouTube Video
शासनाचे लावलेल्या निर्बंध सोमवारपासून आणखीनच कठोर करण्यात आले. मेडिकल दुकाने वगळता भाजीपाला, किराणासह अत्यावश्यक सेवेतील इतर दुकाने पूर्णपणे बंद करून फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी दिली आहे. प्रशासनाने 24 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लावला असून, शहरातून विनाकारण फिरणाऱ्या नागरिक, दुचाकी व चारचाकी धारकांवर धडक कारवाई करत आहेत. शेकडोहून अधिक वाहनधारकांवर कारवाई करून दंड वसूली आणि वाहन जप्ती पोलिसांनी केली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर व नागरिकांवर धडक कारवाई केली जात असून, नागरिकांमध्ये सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई करणार, असा इशारा पोलीस आयुक्त विक्रम आमटे यांनी दिला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यासह देशात हाहाकार माजविला असल्याने शासनाची व प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी बेळगाव शहरातील चौका-चौकात, रस्त्यावर नागरिक अनावश्यक आपली दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन विनाकरण फिरत असताना आढळून आल्यामुळे पोलीस पथकाने धडक कारवाई केली. ही कारवाई 14 दिवस चालणार आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, पोलीस मित्र यांनी कारवाईत भाग घेतला. अनावश्यक वाहने रस्त्यावर दिसल्यावर कारवाईचा धडाका असाच सुरू ठेवणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, नियम न पाळल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. शहरात विनाकारण, विनामास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई चालू असून, नागरिकांनी नियम मोडल्यास कडक कारवाई केली जाईल.
- डाॅ के त्यागराजन, पोलीस आयुक्त, बेळगाव

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : काय सांगता ! होय, चक्क डॉक्टरांचे कपडे घालून रस्त्यावर उतरला तरुण आणि... अजब! VIDEO

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm