बेळगाव : 160 जणांनी केले महादान रक्तदान; 3 रुग्णवाहिका सेवेत

बेळगाव : 160 जणांनी केले महादान रक्तदान;
3 रुग्णवाहिका सेवेत

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कोरोना महामारीत प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने श्रीराम सेना हिंदुस्थानने 3 रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत, अशी माहिती अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी दिली. श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराप्रसंगी कोंडुसकर बोलत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने आम्ही रुग्णसेवेसाठी 8 रुग्णवाहिका उपलब्ध केले आहेत. त्याप्रमाणे ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा करण्यासाठी एक वाहन तैनात करण्यात आले आहे.
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर तीन-चार महिने रक्तदान करता येत नसल्यामुळे रविवारी रक्तदान शिबिराचेही आयोजन केले आहे, असे रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले. रविवारी मराठा सांस्कृतिक भवन येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. सदर शिबिरामध्ये 160 जणांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवून रक्तदान केले. या रक्तदात्यांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांसह श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सध्या शहरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मुबलक प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. त्याचप्रमाणे कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीचा गैरफायदा घेऊन वैद्यकीय सुविधा पुरविताना लोकांची लुबाडणूक केली जात आहे. या प्रकारांना देखील त्वरित पायबंद घातला जावा. तसेच रुग्णवाहिका किंवा अन्य कोणतीही गैरसोय असल्यास नागरिकांनी श्रीराम सेना हिंदुस्तानच्या पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही रमाकांत कोंडुसकर यांनी केले.
YouTube Video पाहा
Watch YouTube Video

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 160 जणांनी केले महादान रक्तदान; 3 रुग्णवाहिका सेवेत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm