CoronaVirus चहा जास्त प्यायलाने कोरोना होत नाही?; केंद्र सरकारनं सांगितलं यामागचं सत्य

CoronaVirus चहा जास्त प्यायलाने कोरोना होत नाही?
;
केंद्र सरकारनं सांगितलं यामागचं सत्य

belgavkar.com | belgaum | belgavkar

CoronaVirus सोशल मीडियावर काही गोष्टी कोरोनावरी उपाय असल्याचं सांगून पसरवल्या जात आहेत आणि लोकांचा त्यावर विश्वास बसतो आहे. यापैकीच व्हायरल झालेली एक गोष्ट म्हणजे जास्त चहा प्यायल्याने कोरोनाचं संक्रण होत नाही. मास्क, व्हॅक्सिन आणि सोशल डिस्टन्सिंग हेच केवळ तुम्हाला कोरोना संक्रमणापासून वाचवू शकतात. मात्र या काळात कोरोनापासून वाचण्यासाठी लोकं घरबसल्या काही उपाय करत आहे. सोशल मीडियावर काही गोष्टी कोरोनावरी उपाय असल्याचं सांगून पसरवल्या जात आहेत आणि लोकांचा त्यावर विश्वास बसतो आहे.
सोशल मीडियावर एक बातमी शेअर केली जात आहे, ज्यामध्ये हेडलाइनमध्ये असं म्हटलं आहे की, 'खूप चहा प्या आणि पाजा, चहा पिणाऱ्यांसाठी खूशखबर'. या बातमीत असं म्हटलं आहे की चहा पिणारे कोरोना संक्रमणापासून वाचू शकतात. काही लोक सोशल मीडियावर असा देखील दावा करत आहेत की, चीनच्या रुग्णालयांनी कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णांना दिवसातून तीन वेळा चहा देण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा देखील झाल्याचा दावा केला जात आहे.
मेसेजमध्ये अमेरिकेतील सीएनएन न्यूज चॅनेलचा हवाला देत असं म्हटलं आहे की, चीनमधील कोरोना विषाणू संदर्भात विशेषज्ज्ञ त्यांच्या मृत्यूआधी असं सांगून गेले आहेत की, Methylxanthine, Theobromine आणि Theophylline हे केमिकल कोरोना विषाणूला मारू शकतात. हे तीनही केमिकल चहामध्ये आढळून येतात. मात्र केंद्र सरकारकडून PIB फॅक्ट चेकच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा दावा फेटाळण्यात आला आहे. या दाव्यामागे कोणतंही वैज्ञानिक प्रमाण नाही आहे की चहामुळे कोरोनाच्या संक्रमणाचा धोता कमी केला जाऊ शकतो, असं पीआयबीनं म्हटलं आहे. सोशल मीडियावरील अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केलं आहे.
कोरोना आजाराची बरीच लक्षणे सांगितली जातात. सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, उलटी ही लक्षणे ऋतू बदलाच्या काळातही दिसून येतात. सध्या शहारांप्रमाणेच ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. त्यांना शारीरिक, मानसिक व्याधींनीही ग्रासले आहे. आजीबाईच्या बटव्यात लहानसहान आजारांवर औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींच्या पाने, फुले, फळे, साली आणि खोडांच्या भागांपासून आरामदायी रामबाण उपाय आहेत. मात्र हे फक्त इम्युनिटी वाढीसाठी उपयोगी असतात. गुगलवर सर्च केल्यावर कोणत्या वनस्पतींपासून कशा प्रकारचा फायदा होतो, याविषयी माहिती सहज उपलब्ध आहे. कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळविण्यासाठी निर्बंध लागू असून, शाळांना सुटी, तर वर्क फ्रॉम होम सुरू आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

CoronaVirus चहा जास्त प्यायलाने कोरोना होत नाही?; केंद्र सरकारनं सांगितलं यामागचं सत्य

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm