बेळगाव : सीमा नाक्यावर कडक तपासणी; कर्नाटकात 'नो एंट्री';

बेळगाव : सीमा नाक्यावर कडक तपासणी;
कर्नाटकात 'नो एंट्री';

belgavkar.com | belgaum | belgavkar

महाराष्ट्रातून कर्नाटकात 'नो एंट्री';
कोगनोळीत कडक बंदोबस्त Lockdown

बेळगाव ता. निपाणी - कोगनोळी : महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून याचा फटका कर्नाटक सीमाभागाला बसत आहे. त्यामुळे राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार निपाणी पोलिसांतर्फे कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी तपासणी नाका येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. Lockdown च्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावरून महाराष्ट्र व अन्य राज्यांतून येणाऱ्या चारचाकी वाहनधारकांना परत पाठवून देण्यात येत आहे.
कर्नाटकात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 10 ते 24 मे अखेर राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. सुरू झालेल्या या कारवाईमुळे महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली. केवळ अत्यावश्यक वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. दोन - तीन महिन्यांपासून कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरून महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवून कर्नाटकात प्रवेश दिला जात होता. कर्नाटक शासनाने 10 ते 24 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्याने महाराष्ट्र व इतर राज्यांतून अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही कर्नाटकात प्रवेश दिला जाणार नाही. त्याची अंमलबजावणी रविवारपासून सुरू झाली.
कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांची मोठी पंचाईत झाली. कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी प्रवाशांनी येथे उपस्थित अधिकाऱ्यांना विनवण्या सुरू केल्या होत्या. सीमा तपासणी नाक्यावरून अत्यावश्यकमधून वैद्यकीय सेवेला सुभा दिली आहे. त्यांची सर्व माहित नोंद करूनच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. सीमा तपासणी नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त तीन शिफ्टमध्ये सुरू आहे. कोरोना तपासणी संबंधित असलेली सर्व ती कागदपत्रे पडताळून मगच कर्नाटकात प्रवेश देण्याच्या सूचना आलेल्या आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : सीमा नाक्यावर कडक तपासणी; कर्नाटकात 'नो एंट्री';
महाराष्ट्रातून कर्नाटकात 'नो एंट्री'; कोगनोळीत कडक बंदोबस्त Lockdown

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm