CoronaVirus मासे, अंडी आणि डार्क चॉकलेट खा! रोग प्रतिकारशक्ती वाढवणार्‍या पदार्थांची यादी जाहीर

CoronaVirus मासे, अंडी आणि डार्क चॉकलेट खा! रोग प्रतिकारशक्ती वाढवणार्‍या पदार्थांची यादी जाहीर

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोरोना काळात रोगप्रतिकारशक्तीच आपल्या कामी येणार म्हणून निरनिराळे फंडे अजमावून पाहिले जात आहेत. हळद टाकलेले गरम दूध पिण्याकडे आणि च्यवनप्राश खाण्याकडे लोकांचे मन पुन्हा वळले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत व्हावी यासाठी पोषक आहार घेण्याकडे जनतेचा कल वाढला आहे. आता तर थेट केंद्र सरकारनेच नैसर्गिक प्रकारे आपली रोगप्रतिकारशक्ती घरच्या घरी कशी वाढवावी, अशा पौष्टिक पदार्थांची यादीच जाहीर केली आहे.
कोविड साथीत पोषक आहार घेण्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. केंद्र सरकारनेही आता काही पदार्थांची यादी आपल्या ‘mygovindia’ ट्विटर हँडलवर दिली आहे. योग्य आरोग्यदायी पदार्थ योग्य प्रमाणात खाणे आवश्यक मानले जात आहे. कोविड झाल्यानंतरही पेशंटना लवकरात लवकर ताकद यावी, त्यांचे स्नायू बळकट व्हावेत, त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी आणि त्यांना उत्साही वाटावे यासाठी योग्य प्रमाणात प्रोटीनयुक्त आहार दिला जात आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्ती वाढण्यासाठी नियमित व्यायाम करणे, असे उपाय सरकारने सुचविले आहेत.
आयुष मंत्रालयानं सांगितलेले उपाय पुढिलप्रमाणे :
1. दिवसभरात गमर पाण्याचं सेवन करा. सकाळी, संध्याकाळी गरम पाण्यात चिमुटभर मीठ आणि हळद टाका आणि या पाण्यानं गुळण्या करा.
2. घरी तयार केलेलं ताजं आणि पचण्यास हलकं असणाऱ्या अन्नाचं सेवन करा. जेवणार जीरं, धने, हळद, सुंठ आणि लसणाचा वापर करा.
3. व्हिटॅमिन सीसाठी लिंबू आणि आवळ्याचं सेवन करा. आवळा आणि लिंबू यांचं समावेश असणाऱ्या पदार्थांचाही वापर करु शकता.
4. दररोद कमीत कमी 30 मिनिटांसाठी योग, प्राणायाम आणि मेडिटेशन करा.
5. दिवसा झोप घेण्याऐवजी रात्री 7 ते 8 तासांसाठी झोप घ्या.
6. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सकाळी-संध्याकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासह च्यवनप्राश खा.
7. रात्री हळदीच्या दूधाचं सेवन करा. एक ग्लास दूधात जवळपास अर्धा चमचा हळद एकत्र करुन त्याचं सेवन करा.
8. दररोज दिवसातून दोन वेळा जेवणानंतर कोमट पाण्यासोबत गुळवेल 500 मिलीग्रॅम/अश्वगंधा 500 मिलीग्राम घेऊ शकता.
9. तुळस, काळी मिरी, सुंठ आणि दालचिनी यांपासून तयार करण्यात आलेला हर्बल चहा किंवा काढ्याचं सेवन करा.
10. सकाळ-संध्याकाळी नाकात तिळाचं तेल, खोबऱ्याचं तेल किंवा गाईच्या दूधापासून तयार केलेलं तूप घाला.
11. कोरडा खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी वाफ घ्या. वाफ घेताना पाण्यात पुदिन्याची पानं, ओवा किंला कापराचा वापर करु शकता.
12. दिवसातून दोन वेळा लवंग किंवा ज्येष्ठमध पावडर मध किंवा साखरेसोबत एकत्र करुन खा. यामुळे खोकला, घशातील खवखवीपासून आरम मिळेल.
सध्याच्या कोरोना काळात आपण अन्नात धने, जीरे, सुंठ, हळद आणि लसणाचा जास्तीत-जास्त वापर केला पाहिजे. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. धणे पावडर विशेषतः भारतीय खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाते. बहुतेक सर्व घरांमध्ये हा एक सामान्य मसाला आहे. धणे खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. विशेष म्हणजे धन्याचे सेवन करून आपण अनेक आजारांना आपण दूर ठेऊ शकतो.
या अन्नपदार्थांचा आहारात समावेश कराच : बहुतांशी कोरोना पेशंटची आजारात वास व चव जाते, तसेच अन्न गिळताना त्रास होतो, त्यावेळी त्यांना सहज चावता येईल असे नरम पदार्थ थोड्या थोड्या अंतराने द्यावेत व त्यात आमचूर पावडर टाकावी. शरीराला आवश्यक विटामिन्स व खनिजे मिळण्यासाठी पाच रंगित फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा.
नैराश्य, चिंता दूर करण्यासाठी सत्तर टक्के कोका पावडर असलेले डार्क चॉकलेट थोड्या प्रमाणात खावे. प्रोटीन वाढीसाठी चिकन, मासे, अंडी, सोया, शेंगदाणे आणि कडधान्ये यांचा समावेश आहारात करावा. नियमित व्यायाम करावा, योगा करावा, श्वसनाचा व्यायाम (प्राणायम) झेपेल तसा करावा. आरोग्यदायी स्निग्धपदार्थात अक्रोड, ऑलिव्ई ऑईल आणि राईच्या तेलाचा आहारात समावेश करावा. ज्वारी, ओट्स आणि राजगिरासारख्या धान्याचा आहारात समावेश करावा.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

CoronaVirus मासे, अंडी आणि डार्क चॉकलेट खा! रोग प्रतिकारशक्ती वाढवणार्‍या पदार्थांची यादी जाहीर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm