बेळगाव : हाॅस्पिटलवरील हल्ल्याचा निषेध; दगडफेक आणि मारहाणीचा आरोप | VIDEO

बेळगाव : हाॅस्पिटलवरील हल्ल्याचा निषेध;
दगडफेक आणि मारहाणीचा आरोप | VIDEO

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : देशभरातील पोलीस, डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. आपल्या कुटुंबापासून महिनोंमहिने दूर राहून सामान्यांसाठी दिवस-रात्र झटत आहेत. एकीकडे कोव्हिड योद्ध्यांसाठी टाळ्या वाजतात... त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून फुलांचा वर्षाव करतो. मात्र, दुसरीकडे आपल्या समाजातच एक विदारक चित्र पहायला मिळतंय. कर्तव्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या या कोव्हिड योद्ध्यांवर हल्ले होतायत. डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केली जात असल्याचं चित्र आहे.
बेळगाव शहरातील शहापूरातील माई हॉस्पिटलवर रविवारी रात्री झालेल्या हल्ल्याचा भाजप नेते किरण जाधव यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. सरकारच्या मार्गसूचीनुसार डॉ. मिलिंद हलगेकर यांच्या माई हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. पण कांही समाजकंटकानी हॉस्पिटलवर हल्ला करत साहित्याची मोडतोड केली आहे. सदर घटनेचा भाजप नेते किरण जाधव यांनी निषेध व्यक्त केला आहे. ‘या कठीण काळात सर्व डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि प्रशासन जीवाची बाजी लावत आहे. स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालून ते रुग्णसेवा करत आहे. त्यांना सहकार्य करण्याचं औदार्य आपल्यात नाही का?’ असाच सवाल भाजप नेते किरण जाधव यांनी केला.
YouTube Video पाहा
Watch YouTube Video
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शहर आणि परिसरातील सगळी हॉस्पिटल्स रुग्णांनी भरलेली आहेत. एकीकडे बेडची मागणी वाढत आहे तर दुसरीकडे कोविड सेंटरांना नागरिकांकडूनच विरोध होत आहे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
सध्या डॉक्टर म्हणजे देव म्हणण्याची वेळ आली आहे. डॉक्टर आणि नर्स तसेच वैद्यकीय कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावत असताना समाजकंटकाकडून हॉस्पिटलवर भ्याड हल्ले करणे निषेधार्ह आहे, असे किरण जाधव म्हणाले. किरण जाधव आणि काही सामाजिक संस्था लवकरच जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत. डॉ. हलगेकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कर्नाटक मेडिकल सर्व्हिसेस कायद्यांतर्गत समाजकंटकावर कारवाई केली पाहिजेत, असेही किरण जाधव पुढे म्हणाले.
बेळगाव शहरातील शहापूरात भर नागरी वस्तीत कोविड हाॅस्पिटल झाल्याने कोरोनाची लागण गल्लीतील व परिसरातील इतरांना होण्याची गैरसमज असल्याचा आरोप करत तब्बल शेकडो जणांच्या अज्ञात जमावाने हाॅस्पिटलावर दगडफेक करीत डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांवर हल्ला केलायं धक्काबुक्की केल्याचा प्रकार रविवारी रात्री उशिरा घडला आहे. कोरोना काळात फ्रंटलाईन वारीयर्स ठरलेल्या आणि अनेक रुग्णांसाठी देवदूत ठरलेल्या डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : हाॅस्पिटलवरील हल्ल्याचा निषेध; दगडफेक आणि मारहाणीचा आरोप | VIDEO

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm