बेळगावात तगडा बंदोबस्त ! शहराकडे येणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी | कडक निर्बंध आणि Lockdown

बेळगावात तगडा बंदोबस्त ! शहराकडे येणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी | कडक निर्बंध आणि Lockdown

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव (Belgaum) : कोरोना (Covid-19) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवार (10 मे) पासून बेळगाव शहर व तालुक्‍यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहराकडे येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. लॉकडाउनमुळे (Lockdown) शहरातील रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने 10 ते 24 मे यादरम्यान आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत.
सकाळी 10 वाजल्यानंतर बेशिस्त नागरिकांविरुद्ध कडक व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. केवळ तेवढ्यावरच न थांबता, गरज पडल्यास संबंधित व्यक्तींची वाहनेही जप्त केली जातील, असा इशारा पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिला आहे. सकाळी 6 ते 10 या वेळेत कोणत्याही सबळ कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार आहे. विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनची येथील डीसीपी विक्रम आमटे यांनी शहर व तालुक्‍यातील विविध भागांना भेटी देऊन पाहणी केली. तर पोलिस आयुक्त त्यागराजन यांनीही शहरासह विविध भागांत लावण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्ताची पाहणी केली.
सकाळी 6 ते 10 या वेळेतही बाजारपेठेत भाजीपाला आणि किराणा माल आणण्यासाठी दुचाकी किंव्हा चारचाकी वाहतूकीवरही बंदी असणार आहे. तुम्हाला चालत भाजीपाला आणि किराणा सामनासह दारुसाठा आणण्यास जावे लागणार. Lockdown दरम्यान, विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात येणार आहेत. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. लॉकडाऊनवेळी वाहनांना रस्त्यावर फिरकू देऊ नका, असा आदेश शासनाने दिलेला आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरु राहील.
यापूर्वी सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत भाजीपाला आणि किराणा दुकानांना सवलत देण्यात आली होती. त्यामुळे दररोज गर्दी होत असल्याचे दिसून आले होते. या काळात कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी ती अधिक वाढत असल्याचे चित्र होते. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. नागरिकांना विनाकारण रस्त्यावर फिरण्यासही प्रतिबंद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. बेळगाव शहराकडे येणाऱ्या प्रमुख मार्गांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. अत्यावश्‍यक सेवेतील लोकांना व वाहनांनाच प्रवेश देण्यात येत आहे.
सध्या शहर व तालुक्‍यात दररोज सुमारे 500 - 1000 अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरातील कोव्हिड रुग्णालये फुल्ल झाली आहेत. नवीन रुग्णांना ऑक्‍सिजन बेड आणि रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळवताना रुग्णांच्या नातेवाइकांच्या नाकी नऊ येत आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांचे प्राण जात आहेत. अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये लोकांनीही कोरोना संसर्गाचे भान ठेवणे आवश्‍यक आहे. लोकांमध्ये कोरोना संसर्गाची अधिक जागृती निर्माण व्हावी यासाठी कडक लॉकडाउन पुकारण्यात आला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात तगडा बंदोबस्त ! शहराकडे येणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी | कडक निर्बंध आणि Lockdown

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm