बेळगाव : त्या तालुक्यातही कडक लॉकडाऊन; संपूर्ण Lockdown

बेळगाव : त्या तालुक्यातही कडक लॉकडाऊन;
संपूर्ण Lockdown

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. हुक्केरी : हुक्केरीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाने बळी जाणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेऊन सोमवार 10 मेपासून पुढील 10 दिवस हुक्केरीत कडक लॉकडाऊनचा निर्णय पालिका अधिकारी, सदस्य आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेतला. पोलिस ठाण्याच्या आवारात ही बैठक झाली. लॉकडाऊनच्या काळात किराणा दुकानेसुध्दा बंद राहणार आहेत. भाजी आणि दूध घरपोच मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हुक्केरी शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येमुळे आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या नियमानुसार संपूर्ण 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. हुक्केरी शहरवासीयांच्या आरोग्याचा विचार करून हुक्केरी शहरातील कापड व्यापारी, स्टेशनरी दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून लॉकडाऊनला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
घरोघरी फिरून भाजी विक्रेत्यांना आठवडाभर भाजी विक्रीसाठी सूट देण्यात आली आहे. तथापि त्यांनी वाहनातून शहरात घरोघरी फिरून विक्री करावी लागणार आहे. केवळ औषधांची दुकाने सुरू राहतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी उपनिरीक्षक सिद्राम उण्णद, पालिका मुख्याधिकारी मोहन जाधव आदी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : त्या तालुक्यातही कडक लॉकडाऊन; संपूर्ण Lockdown

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm