बेळगाव : शहापूरात जमावाची हाॅस्पिटलावर दगडफेक; डाॅक्टरांसह कर्मचार्‍यांवर हल्ल्याचा आरोप | Video

बेळगाव : शहापूरात जमावाची हाॅस्पिटलावर दगडफेक;
डाॅक्टरांसह कर्मचार्‍यांवर हल्ल्याचा आरोप | Video

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव शहरातील शहापूरात भर नागरी वस्तीत कोविड हाॅस्पिटल सुरु झाल्याने कोरोनाची लागण गल्लीतील व परिसरातील इतरांना होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत तब्बल शेकडो जणांच्या अज्ञात जमावाने हाॅस्पिटलावर दगडफेक करत डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांवर हल्ला केलायं धक्काबुक्की केल्याचा प्रकार रविवारी रात्री उशिरा घडला आहे.
कोरे गल्ली शहापूर भागातील माई हाॅस्पिटमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व खाजगी हाॅस्पिटल बंद न करता कोविड उपचार करा असा आदेश आहे. त्यानुसार या गल्लीत देखील कोविडवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. गल्लीतील रहिवाश्यांना याची लागण होऊ शकते असा आरोप करत जमावाने हाॅस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या नर्स आणि डॉक्टरचे अंगावरील कपडे फाडले.
YouTube Video पाहा
Watch YouTube Video
यावेळी या भागात बराच गोंधळ निर्माण झाला होता. डॉक्टर आणि हाॅस्पिटळावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता आयएम ए बेळगाव शाखेने बैठक बोलावली आहे. त्या नंतर डॉक्टरांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. कोरोना काळात फ्रंटलाईन वारीयर्स ठरलेल्या आणि अनेक रुग्णांसाठी देवदूत ठरलेल्या डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : शहापूरात जमावाची हाॅस्पिटलावर दगडफेक; डाॅक्टरांसह कर्मचार्‍यांवर हल्ल्याचा आरोप | Video

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm