बेळगाव : कर्फ्यूत शटर ओपन; कोरोनाचे नियम धुडकावल्याने व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

बेळगाव : कर्फ्यूत शटर ओपन;
कोरोनाचे नियम धुडकावल्याने व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कोरोनाच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी कोरोना कर्फ्यूत सकाळी 6 ते दुपारी 12 या काळात अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्याचा आदेश दिला. या काळात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व कोरोनासंदर्भात देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून आपण आपला व्यवसाय करू शकता, असा आदेश दिला असतानाही या आदेशाला केराची टोपली दाखवून दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारावर खडेबाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत हेल्मेट आणि कपड्याचे दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी शिवाजी रोड येथील व्यापाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दशरथ धारवाडकर (रा.अनंतशयन गल्ली) असे व्यापाऱ्याचे नाव आहे. कोरोनाच्या पाश्वर्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे. तरीदेखील काही व्यापारी दुकाने उघडून व्यवसाय करीत आहेत.
छत्रपती शिवाजी रोडवरील रेडिओ कॉम्प्लेक्स समोरील एका इमारतीमध्ये हेल्मेट आणि कापड विक्री दुकान सुरू आहे. अशी माहिती खडेबाजार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जे. आय. देवडे यांनी याप्रकरणी स्वतःहून फिर्याद दाखल केली आहे. यामुळे शासन आदेशाचे उल्लंघन केल्याचा त्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कर्फ्यूत शटर ओपन; कोरोनाचे नियम धुडकावल्याने व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm