बेळगाव : विंचू चावल्यानंतर 3 वर्षीय बालकाच्या उपचारासाठी रुग्णालयात हेलपाटे

बेळगाव : विंचू चावल्यानंतर 3 वर्षीय बालकाच्या उपचारासाठी रुग्णालयात हेलपाटे

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : शेतात विंचू चावल्यानंतर 3 बालकाच्या उपचारासाठी त्याच्या वडिलांना जिल्हा रुग्णालयात हेलपाटे मारावे लागले. यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. विंचवाने दंश केल्यामुळे एका बालकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचार करणे दूरच, त्याच्याकडे कोणी लक्षही दिले नाही. त्यामुळे नातेवाईक व पालकांना उपचारासाठी हेलपाटे मारावे लागले. यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.
बेळवट्टीतील (ता. बेळगाव) बडिगेर नामक कामगाराच्या मुलाला शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास विंचवाने दंश झाला होता. वेदनेने तळमळणाऱ्या मुलाला घेऊन बडिगेर जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. मात्र, या लहान मुलाला होणाऱ्या वेदना पाहूनही कोणालाही पाझर फुटला नाही. उपचार करणे तर दूरच, या बापलेकांना या वार्डातून त्या वार्डात पाठवून दिल्यामुळे त्यांची दमछाक झाली.
याची माहिती मिळताच बिजगर्णीचे तालुका पंचायत सदस्य एन. के. नलवडे यांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेऊन बिम्सचे अधीक्षक डॉ. जी. एल. दंडगी यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. त्यांनतर त्यांनी त्या मुलावर उपचार करण्याची सूचना संबंधित डॉक्टरांना केली. बिम्सचे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर कोरोनामुळे वाढता ताण आहे, हे जरी खरे असले तरी त्या बालकांवर उपचार करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : विंचू चावल्यानंतर 3 वर्षीय बालकाच्या उपचारासाठी रुग्णालयात हेलपाटे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm