बेळगाव : बोरगावात स्टोन क्रशरच्या खाणीत पडून युवकाचा मृत्यू

बेळगाव : बोरगावात स्टोन क्रशरच्या खाणीत पडून युवकाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : बोरगाव (ता. निपाणी) येथील विश्वनाथ स्टोन क्रशर येथे एका युवकाचा खाणीत पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. अमोल मल्लू शिंदे (वय 26, रा. बोरगाववाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मयत अमित हा गेल्या अनेक वर्षांपासून या स्टोन क्रशर येथे कामाला होता.
नेहमीप्रमाणे खाणीवर काम करीत असताना तोल गेल्याने तो खोल खाणीत पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला. मयत अमोल हा मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर. आर. पाटील व पोलीस उपनिरीक्षक आर. वाय. बिळगी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. भाऊ अमित शिंदे यांनी सदलगा पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. मृत अमोलच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बोरगावात स्टोन क्रशरच्या खाणीत पडून युवकाचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm