बेळगाव : तोतया जवानाने लॅबचालकाला चुना लावला
लॅब चालक

बेळगाव : तोतया जवानाने लॅबचालकाला चुना लावला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. कथित तोतया जवानाने लॅबचालकाची फसवणूक करून 10000 रुपयाला चुना लावला आहे. याबाबत मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. आझादनगर येथील मुजम्मिल खतालअहमद कलईगार हे 'अल्फा क्लिनिक लॅब' नावाने रक्त, मूत्र चाचण्यांची लॅबोरेटरी चालवितात. आर्मीत असल्याचे सांगणाऱ्या प्रमिलकुमार नामक एकाने त्यांना फोन करून ब्लड टेस्ट करण्याबाबत विचारले.
कलईगार यांच्याकडे 4-5 वर्षांपासून आर्मीतील लोक चाचण्या करून घेण्यासाठी येतात. तसाच कोणीतरी असावा, अशी कलईगार यांची समजूत झाली. रक्ताच्या विविध चाचण्यांसाठी एका व्यक्तीला 1000 रुपये बिल होईल, असे त्यांनी प्रमिलकुमारला सांगितले. त्याने होकार दर्शवून, उद्या 25 जणांचे ब्लड सॅम्पल्स घेण्यास यावे लागेल; असे सांगितले. तसेच गुगल पे, फोन पे नंबर विचारला. कलईगार यांनी त्याला गुगल पे नंब दिला. त्यानंतर प्रमिलकुमार याने पुन्ह. फोन करून तुमच्या खात्यावर 5 रुपये जमा होतील, ते पाहा व कन्फर्म करा असे सांगितले. त्याप्रमाणे 5 रुपये जमा झाले.
त्यानंतर प्रमिलकुमारने पुन्हा फोन करून तुमच्या खात्यावर 10000 रुपये जमा होतील, पाहा असे सांगितले. काही वेळानंतर कलईगार यांच्या खात्यात पैसे जमा होण्याऐवजी त्यांच्याच खात्यातील 10000 रुपये दुसऱ्या खात्यात जमा झाल्याचा मेसेज कलईगार यांना आला. त्यावर आपण फसल्याची जाणीव कलईगार यांना झाली. यानंतर कलईगार यांनी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
कथित आर्मीमॅनने आणखी काही लॅबचालकांना संपर्क केल्याची माहिती कलईगार यांना मिळाली आहे. त्यामुळे लॅबचालकांनी सावध होऊन अशा फसवणुकीला बळी पडून नये, असे आवाहन कलईगार यांनी केले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : तोतया जवानाने लॅबचालकाला चुना लावला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm