BSY.jpg | अखेर कर्नाटकात 14 दिवस Lockdown | belgaum news | belgavkar बेळगावकर

अखेर कर्नाटकात 14 दिवस Lockdown

belgavkar.com | belgaum | belgavkar

बँक, कारखाने आणि बांधकाम सुरु राहील... पण कंपनी आणि बांधकाम कामगारांना ये-जा करता येणार नाही

जिल्ह्याअंतर्गत असलेली वाहतूक बंद

गर्दी टाळा | सकाळी 6 ते 10 किराणा व दुध विक्री दुकाने सुरु राहणार
कर्नाटक : कोरोना (Coronavirus) संसर्ग तोडण्यासाठी अखेर कर्नाटक राज्यात लॉकडाऊनचा (karnataka lockdown) निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार 10 मे सकाळी 6 वाजल्यापासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. राज्य सरकारकडून राज्यात 24 मे सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं निर्बंध आणखी कडक केले आहेत.
महत्वाची नियमावली : कारखाने आणि बांधकाम सुरु राहणार
जिल्ह्याअंतर्गत असलेली वाहतूक बंद करण्याचा निर्णय - आंतरजिल्हा प्रवासाला बंदी - फक्त अत्यावश्यक सेवेच्या वाहतूकीला परवानगी
वाहतूकीवर निर्बंध - किराणा आणि भाजीपाला तसेच दारु आणि हाॅटेल पार्सल आणण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहतूकीला बंदी | दुचाकी आणि चारचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी
सोमवारपासून राज्यात पुढील 14 दिवसासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात संचारबंदी आदेश लागू असणार आहेत. या काळात अत्यावश्यक सुविधा आणि अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या लोकांसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. यामध्ये केवळ औषधे आणि किराणा व दुध, मास विक्री दुकाने सुरु राहणार आहेत.
सकाळी 6 ते 10 किराणा व दुध विक्री दुकाने सुरु राहणार
मेट्रो रेल्वे बंद
रेल्वे आणि विमानसेवा सुरु
आँटो रिक्षा आणि टँक्सी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी
आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासाला बंदी (only emergency सोडून)
बँका आणि एटीएम सुरु राहतील
लग्नाला परवानगी (50 जणांची परवानगी) - फक्त 50 जण लग्न सोहळ्याला उपस्थितीत राहू शकता. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
अंत्यसंस्काराला 5 जणांची परवानगी
मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी कामगार आणि मजुरांना घाबरून न जाता स्थलांतर न करण्याचं आवाहन केलं आहे. राज्य सरकारकडून मजुरांची योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. 
जिल्ह्यातील उद्योग बंद राहण्याची शक्यता
सर्व उद्योगधंदे आणि बांधकाम राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम व अटीनुसार सुरू ठेवावे लागतील. कामगारांना कंपनीतच (बांधकाम कामगारही) ठेवावे, किंवा इतर कुठे ही एकत्रित ठेवावे. कामगारांना दररोज ये-जा करता येणार नाही. अन्यथा बंद ठेवावेत. त्यामुळे बेळगावातील सर्वच उद्योगधंदे बंद राहण्याची शक्यता आहे.
या गोष्टी बंदच राहतील शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, हॉटेल, थिएटर, मनोरंजन पार्क, व्यायामशाळा, जलतरण, माॅल, जिम, क्रीडा संकुल, सामाजिक/राजकीय/सांस्कृतिक समारंभ.
अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकानं बंद राहतील
सर्व धार्मिकस्थळे (मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च अन्य ठिकाणे)
सलून, स्पा आणि ब्युटी पार्लर, केशकर्तनालये बंद राहणार.
यादरम्यान, राज्यातील जिल्हा अंतर्गत वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इतर जिल्ह्यातून दूसऱ्या जिल्ह्यात जाण्यात मनाई करण्यात आली आहे.
रिक्षा आणि टॅक्सीला फक्त अत्यावश्यक आणि emergency सेवेसाठी

सार्वजनिक व खाजगी जीवनावश्‍यक सेवांची तथा इतर वाहतूक (उदा. दूध, किराणा माल,पेट्रोल, डिझेल, गॅस, उद्योगांना इ.) सुरु राहिल.
मेडिलक, डेअर, रेशन दुकान, भाजीपाला वगळता सर्व दुकाने, मॉल, मल्टिप्लेक्स, मंदिरे, गार्डन्स, जिम इत्यादी बंद.
सरकारी दारु दुकाने चालु - सकाळी 6 ते 10 - फक्त पार्सल
गेल्या दोन दिवसांपासून कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा अशी चर्चा या बैठकीत झाली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आज याबद्दल निर्णय जाहीर करणार होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय निवडा, असा सल्ला दिला होता. परंतु, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाऊनचाा पर्याय निवडण्यात आला आहे. 24 मे सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन असणार आहे.