बेळगाव : ऑक्सिजन टँकरला अपघात; सुदैवानेच...

बेळगाव : ऑक्सिजन टँकरला अपघात;
सुदैवानेच...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात ऑक्सिजनची आणीबाणी आहे. त्यातच
बळ्ळारीहून बेळगावकडे लिक्विड ऑक्सिजन घेऊन येणाऱ्या ऑक्‍सिजन टँकरची आणि लॉरीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर मुत्नाळ गावाजवळ घडली. सुदैवानेच या अपघातात ऑक्सिजन गळती किंवा प्राणहानी झालेली नाही. बळ्ळारी इथून बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांना ऑक्‍सिजन पुरवठा केला जातो.
NH4 वर मुत्नाळ गावाजवळ आज (शुक्रवार 7 मे) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. ऑक्सिजनवाहू टँकरने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरील लॉरीला धडक दिली. सुदैवानेच या अपघातात स्फोट, ऑक्सिजन गळती किंवा प्राणहानी झालेली नाही. मात्र धडक एवढी जबरदस्त होती कि, धडक बसताच टँकरचा टायर फुटून एक्सल मोडला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस व संबंधित अधिकाऱ्यांनी अपघातस्थळी दुसरा टँकर मागवून लिक्विड ऑक्सिजनची टाकी हलविण्याचे प्रयत्न सुरु केले. यासाठी महामार्गावरील वाहतूक काहीकाळ बंद ठेवण्यात आली. अपघातग्रस्त टँकरमध्ये 16 केएल क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन होता असे सांगण्यात आले. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ऑक्सिजन टँकरला अपघात; सुदैवानेच...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm