बेळगाव : त्यांनी गोव्याहून भरून आणले ऑक्सिजन सिलेंडर

बेळगाव : त्यांनी गोव्याहून भरून आणले ऑक्सिजन सिलेंडर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कोविड-19 च्या रुग्णांसाठी अत्यावश्यक ऑक्सिजनची प्रचंड कमतरता निर्माण झाल्याने अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा या कठीण प्रसंगात दिलासा देणाऱ्या, माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. बेळगावात सगळीकडे रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता आहे. ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजप नेते व राज्य ओबीसी मोर्चा सचिव श्री. किरण जाधव यांनी गोव्याच्या प्रशासनाशी संपर्क साधून येथील परिस्थिती त्यांच्या निर्देशनास आणून दिली आणि गोवा येथून 4 ऑक्सिजन सिलेंडर भरून आणले.
ह्यासाठी बेळगाव येथील किरण जाधव यांचे मित्र परूळेकर अँड कंपनी यांनी रिक्त सिलेंडर्स उपलब्ध करुन दिले आहे. हे ऑक्सिजन सिलेंडर्स बेळगाव येथील रुग्णांना वाटप करण्यात आले आहे. ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा कमी झाल्यामुळे काळ्या बाजारात तब्बल 25 ते 30 हजार रुपयांना त्याची विक्री होत होती. त्यांनी आपल्या परिसरात रुग्णांना ऑक्सिजन सिलेडर पुरवण्याचं काम सुरू केलं आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी ते अथक प्रयत्न करत आहेत.
देशात सध्या कोरोना संसर्गाचा विस्फोट झाल्याचे चित्र आहे. दररोज लाखांच्या संख्येत नवीन करोनाबाधित वाढत आहेत. रूग्णांचा मृत्यू संख्येही मोठी भर पडत आहे. परिणामी आरोग्यंत्रणा कोलमडत आहेत. रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड, रेमडेसिविर व लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे रूग्णांचे हाल होत असून, रूग्णांच्या नातेवाईकांना देखील विविध अडचणींना समोरं जावं लागत आहे. ही वस्तूस्थिती जाणत त्यांनी गोव्यातून ऑक्सिजन सिलेंडर भरून आणले आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : त्यांनी गोव्याहून भरून आणले ऑक्सिजन सिलेंडर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm