बेळगावच्या आमदारांनी दिले कॉविड केअर सेंटरला 5 ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर

बेळगावच्या आमदारांनी दिले कॉविड केअर सेंटरला 5 ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णांची अवस्था गंभीर होत आहे. अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे, अशा परिस्थितीत रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी बेळगाव उत्तर व दक्षिणच्या आमदारांनी सुभाषनगर व कुमारस्वामी लेआउट येथील कोविड केअर सेंटरला 5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून दिले आहे. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असताना अनेकांना ऑक्सिजन मिळत नसल्याने प्राण गमावण्याची वेळ येत आहे, नेमकी ही गरज ओळखून गंभीर झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन मिळावे याकरता 5 oxygen concentrator मशीन उपलब्ध करून कोविड सेंटरला भेट देत सामाजिक बांधिलकी जपली.
कोरोना संसर्गाच्या महामारीपासून सर्वसामान्य जनतेला वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आमदार अभय पाटील व अनिल बेनके यांनी 5 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट दिले आहेत. याचा वापर गोरगरीब जनतेसाठी करण्यात यावा. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. सद्यस्थितीत ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्याला पर्याय म्हणून ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मिळवण्यात आले आहे.
सध्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची सातत्याने कमतरता भासत असून प्रशासन ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल मागणीप्रमाणे मिळत नाही. तसेच ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लांटची क्षमता कमी असल्याने गरजेइतका ऑक्सिजन उत्पादन होत नाही. त्यामुळे उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजनचे वाटप करताना प्रशासनाला नको इतका ताण घ्यावा लागत आहे, त्याला थोडा हातभार लावण्याच्या दृष्टीने अशा प्रकारची आधुनिक उपकरणे भेट देऊन रुग्णालयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना चांगले उपचार मिळून तो लवकरात लवकर बरा व्हावा , हाच अट्टहास कायम राहिलेला आहे. याच दृष्टीकोनातून केवळ सामाजिक बांधिलकीतून आमदारांनी कोविड सेंटरला 5 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन भेट दिल्या.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावच्या आमदारांनी दिले कॉविड केअर सेंटरला 5 ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm