बेळगाव : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

बेळगाव : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : आता एक वादग्रस्त व्हिडिओ WhatsApp Status ला शेअर केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. शेअर केलल्या या व्हिडीओमुळं नवा वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो एडीट करून अपमानकारक व्हिडिओ स्टेटसला ठेवल्या प्रकरणी अझमनगर येथील अस्लम नामक व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते नरू निलजकर यांनी आज (5 मे) एपीएमसी पोलिस स्थानकात फिर्याद देऊन गुन्हा नोंदविला आहे. पोलिस आता त्या युवकाचा शोध घेत आहेत.
त्या युवकानं एक वादग्रस्त व्हिडीओ शेअर केलंय. या व्हिडीओत टिपू सुलतान आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात टिपू सुलतान तलवार देत आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि मोदीही हात जोडताना दाखवण्यात आलं आहे. या व्हिडीओमुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm