anil-benke-and-abhay-patil-belgaum.jpg | बेळगाव शहरात 3 ठिकाणी 352 बेडची व्यवस्था CoronaVirus | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव शहरात 3 ठिकाणी 352 बेडची व्यवस्था CoronaVirus

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव शहरासह जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा विचार करून महापालिकेतर्फे शहरात 3 ठिकाणी कोविड पॉझिटिव्ह रूग्णांसाठी 352 मोफत बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके व दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून हे बेड उपलब्ध झाल्याचे दोन्ही आमदारांनी प्रसिद्धीस दिले आहे.
बेळगाव शहरातील देवराज अर्स विद्यार्थी वसतीगृह, सुभाषनगर येथे 150, कुमारस्वामी ले - आऊट ओबीसी हॉस्टेल येथे 112 व बीसीएम हॉस्टेलमध्ये 90 बेड अशा एकूण 352 मोफत बेड असलेल्या कोविड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मोफत राहण्याची, नाश्ता व जेवणाची तसेच 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.
कोणाला या सेवेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांनी महापालिका साहायक दूरध्वनीवर (क्रमांक 0831-2405316 व 9481504229) संपर्क साधावा,असे आवाहन केले आहे.