coronavirus-live-updates-india-state.jpg | Coronavirus देशात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 3780 रुग्णांचा मृत्यू, तर 3.82 लाख नवे कोरोनाबाधित | belgaum news | belgavkar बेळगावकर

Coronavirus देशात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 3780 रुग्णांचा मृत्यू, तर 3.82 लाख नवे कोरोनाबाधित

belgavkar.com | belgaum | belgavkar

Coronavirus देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत एका दिवसातील सर्वाधिक मृतांचा आकडा समोर आला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 382,315 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3780 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. दरम्यान, 3,38,439 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात यापूर्वी एक मे रोजी 3689 सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता.
देशातील आजची कोरोना स्थिती : एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 6 लाख 65 हजार 148
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 69 लाख 51 हजार 731
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 34 लाख 87 हजार 229
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 26 हजार 188
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 15 कोटी 49 लाख 89 हजार 635 डोस