blood_donation_blood.png | बेळगाव : रक्तदान शिबिराचे आयोजन; रक्तदानाचे आवाहन | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : रक्तदान शिबिराचे आयोजन; रक्तदानाचे आवाहन

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी शासन स्तरावरूनही बरेच प्रयत्न सुरू आहेत. तसेच रुग्णालयातही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तसेच काही कोरोना रुग्ण गंभीर असून, त्यांना मोठ्या प्रमाणात रक्ताचीही गरज लागतेय. एकीकडे वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रक्ताची गरज वाढली असून, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे विश्व हिंदू परिषद बजरंग दलामार्फत रक्तदानाचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय.
बेळगाव शहरात जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन : या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आलेय. उद्या बुधवारी (5 मे | सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत) भाग्यनगर, अनगोळ परिसरातील संतमीरा शाळेत रक्तदान शिबिराचे बजरंग दलाकडून आयोजन करण्यात आले आहे. स्वतः ही रक्तदान करून लोकांनाही रक्तदान करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.
बुधवार 5 मे | सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत
संतमीरा शाळा, भाग्यनगर, अनगोळ